शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांना खिचडीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:23 IST

औरंगाबाद : पुरवठादार संस्थेचा करार संपुष्टात आल्यामुळे मागील १२ दिवसांपासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा ...

ठळक मुद्देविद्यार्थी उपस्थितीवर परिणाम झाला दोन महिन्यांपूर्वीच पुरवठादार संस्थेचा करार संपुष्टात

औरंगाबाद : पुरवठादार संस्थेचा करार संपुष्टात आल्यामुळे मागील १२ दिवसांपासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा बंद झाला आहे. तथापि, जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये खिचडीचे वाटपही बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला आहे. 

वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खाजेकर यांनी सांगितले की, काही शाळांमध्ये शिल्लक तांदळातून खिचडी शिजवली जाते. ३० नोव्हेंबरपर्यंतचा पुरवठादार संस्थांसोबतचा करार संपुष्टात आला. या संस्थांना धान्यादी माल व तांदूळ पुरवठ्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार पुरवठादाराचे ३१ जानेवारीपर्यंत पुरवठा करण्याचे आदेश होते. महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात पुरवठादार संस्थांसोबत शासनाचा करार झालेला नाही. दोन दिवसांत हा करार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शाळांमध्ये नियमित खिचडी शिजेल, असे खाजेकर म्हणाले. 

शाळांना खिचडी शिजविण्यासाठी मटकी, वाटाणा, तेल, हळद, तिखट, डाळी यांसारखे धान्यादी साहित्य पुरविणाऱ्या संस्थांसोबतचा करार संपुष्टात आल्यामुळे १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये पोषण आहार योजनेला घरघर लागल्याचे चित्र आहे. अशाही परिस्थितीत मुलांना खिचडी द्यावी, तर आर्थिक बोजा, रखडणारी बिले यामुळे अगोदरच मुख्याध्यापक त्रस्त आहेत. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वत:च्या पैशातून खिचडी न शिजविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागात आई-वडील मजुरीसाठी गेल्यानंतर बहुतांशी मुलांना शाळेत मिळणाऱ्या खिचडीवरच अवलंबून राहावे लागते. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून शाळांमध्ये खिचडी मिळत नसल्यामुळे मुलांचे मन शाळेत रमत नाही. मुलांच्या उपस्थितीवर परिणाम झालेला आहे. वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. या दिवसांत मध्यान्ह भोजन बंद झाले आहे.

पर्यायी व्यवस्था करावीशालेय पोषण आहार योजना ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. पुरवठादारासोबतचा करार संपणे, तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा बंद होणे, हे प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अवहेलना करणारे आहेत. शालेय पोषण आहार ही महत्त्वपूर्ण योजना असल्यामुळे शासनाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे; पण प्रत्यक्षात तसे होत नसल्यामुळे त्याचा फटका गोरगरीब विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांना बसत आहे. त्यासाठी पुरवठादार संस्थांसोबतचा करार लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजीव बोचरे, सरचिटणीस मनोज चव्हाण, अनिल सिरसाट, संजय खोमणे, ज्ञानेश्वर कपटी आदींनी केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळा