शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये जीएसटी कमी होऊनही जुन्याच दराने विक्री चालू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 15:27 IST

दि. १५ नोव्हेंबरपासून सुधारित जीएसटीनुसार नव्या किमतीत वस्तू मिळतील, असे आदेश असतानाही जुन्याच एमआरपीनुसार दुकानदारांनी वस्तू विकल्या आणि ग्राहकांनीही डोळे झाकून बिनबोभाट त्या वस्तू खरेदी करून स्वत:ची फसवणूक करून घेतली.

ठळक मुद्देवस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेच्या मागच्या आठवड्यात झालेल्या २३ व्या बैठकीत जीएसटी कपातीचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान तब्बल १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला.

- ऋचिका पालोदकर औरंगाबाद : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेच्या मागच्या आठवड्यात झालेल्या २३ व्या बैठकीत जीएसटी कपातीचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान तब्बल १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला. दि. १५ नोव्हेंबरपासून सुधारित जीएसटीनुसार नव्या किमतीत वस्तू मिळतील, असे आदेश असतानाही जुन्याच एमआरपीनुसार दुकानदारांनी वस्तू विकल्या आणि ग्राहकांनीही डोळे झाकून बिनबोभाट त्या वस्तू खरेदी करून स्वत:ची फसवणूक करून घेतली. बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या विशेष अभ्यासात ही गंभीर बाब निदर्शनास आली.

जीएसटी कपातीनुसार दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहेत. यावर ग्राहकांनी फक्त समाधान व्यक्त करण्यापलीकडे काहीही केले नसून अजिबात जागरूकता न दाखविल्यामुळे दुकानदारांचे चांगलेच फावले असल्याचे दिसून आले.च्युर्इंगम, चॉकलेट, कॉफी, कस्टर्ड पावडर, दंत आरोग्य उत्पादने, पॉलिश, क्रीम, सॅनिटरी वेअर, कृत्रिम फर, केसांचे टोप, कुकर, स्टोव्ह, आफ्टर शेव्ह, डियोड्रंट, डिटर्जंट, वॉशिंग पावडर, रेझर, ब्लेड, कटलरी, स्टोअरेज वॉटर हिटर, बॅटरी, गॉगल, प्लायवूड, मनगटी घड्याळ या वस्तू २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आल्या आहेत. याशिवाय सहा वस्तूंवरील कर १८ टक्क्यांवरून ५ टक्के केला आहे. आठ वस्तूंवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर, तर सहा वस्तूंवरील कर ५ टक्क्यांवरून ० टक्यांवर आला आहे. नव्या नियमानुसार दि.१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ग्राहकांना नव्या दरात वस्तू मिळणे क्रमप्राप्त आहे. 

यासंदर्भात शहरातील काही दुकानांमधे आणि मॉलमध्ये जाऊन पाहणी करण्यात आली. वरील कोणत्याही वस्तूंवर नवीन दराचे टॅग लावण्यात आलेले नव्हते. तज्ज्ञ मंडळींच्या मते दुकानदारांनी नवीन दराचे टॅग लावणे अनिवार्य आहे; मात्र टॅग लावले गेले नसतील तर किमान वस्तू घेतल्यावर येणाºया बिलामध्ये नव्या दरानुसार ग्राहकांकडून पैसे घ्यावेत. उदाहरणार्थ जर दि. १४ रोजी २८ टक्के जीएसटी असताना एखादी वस्तू १०० रुपयाला मिळत असेल तर दि. १५ पासून त्या वस्तूवर १८ टक्के कर लागतो. म्हणजेच जीएसटी थेट १० टक्क्यांनी कमी होऊन त्या वस्तूची किंमत ९० रुपये होते. इथे ग्राहकाच्या खिशातून सरळसरळ जास्तीचे दहा रुपये जात आहेत. 

ग्राहकांना फायदा होणे आवश्यकवस्तूंवरच्या छापील किमती (एमआरपी) रातोरात बदलणे शक्य नसले तरी जीएसटीमध्ये कमी झालेल्या दराचा फायदा हा शेवटच्या ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसे न झाल्यास ग्राहकांचे नुकसान होईल आणि दुकानदारांना वाढीव नफा. सरकारने मूल्यवर्धित करप्रणालीवरून वस्तू व सेवाकरात येताना नफेखोरीविरोधी कायदा करून बदलत्या करप्रणालीत घटलेल्या करदराचा फायदा हा शेवटच्या ग्राहकांना पोहोचावा अशी तरतूद केली आहे; पण अशी कायदेशीर तरतूद जीएसटीमध्ये घटलेल्या दराबाबत सरकार आणते का, ते बघणे औत्सुक्याचे ठरेल. - सीए रोहन अचलिया

ग्राहकच दोषीदि. १५ नोव्हेंबरपासूनच ग्राहकांना नवीन दरात वस्तू मिळणे आवश्यक आहे. तसे होत नसेल तर ती ग्राहकांची फसवणूक आहे; पण याला दुकानदारांपेक्षाही ग्राहक स्वत:च जबाबदार आहेत, कारण सामान्य ग्राहक कधीच कोणत्या गोष्टीसाठी बिलाची मागणी करीत नाही. भविष्यात जर जीएसटी फेल गेले तर त्याला आपणच ग्राहक सर्वस्वी दोषी असू. - सीए उमेश शर्मा