शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांना अंधारात ठेवून औरंगाबाद गुन्हे शाखेकडून गुप्तधन जप्तीची कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:14 IST

गुप्तधन सापडल्यास त्याची माहिती तातडीने महसूल विभागाला देऊन तहसीलदारांच्या ताब्यात गुप्तधन देणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असे असताना शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाने मात्र महसूल विभागाला अंधारात ठेवून काही लोकांकडून गुप्तधन जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

औरंगाबाद : गुप्तधन सापडल्यास त्याची माहिती तातडीने महसूल विभागाला देऊन तहसीलदारांच्या ताब्यात गुप्तधन देणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असे असताना शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाने मात्र महसूल विभागाला अंधारात ठेवून काही लोकांकडून गुप्तधन जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

सिद्धार्थ उद्यानासमोरील कामगार कल्याण मंडळासमोर ३१ जानेवारी रोजी आलेल्या दिगंबर अर्जुन वाघमारे आणि बाबासाहेब वामन शिंदे  (दोघे रा. रांजणगाव शे.) यांना गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे आणि पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पिवळ्या धातूची दोन नाणी मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील नारळा डोणगाव येथील भागीनाथ थोरात यांच्या शेतात गुप्तधन असल्याचे समजले होते. त्यानंतर अर्जुन वाघमारे, दिगंबर वाघमारे, बाबासाहेब शिंदे, प्रकाश चव्हाण, संजय कचरू शेळके, हरिदास चंद्रभान गवळी, दिगंबर चंद्रभान गवळी, धोंडिबा खंदारे आणि तीन बाबा यांनी २७ जानेवारी रोजी थोरात यांच्या शेतात खोदकाम केले. तेथे त्यांना गुप्तधनाचा हंडा मिळाला. या हंड्यातील धन सर्वांनी समान वाटून घेतल्याचे वाघमारे यांनी पोलिसांना सांगितले. शिवाय काही नाणी ज्ञानेश्वर त्रिंबक सोनवणे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती मिळताच पोलिसांनी या सर्वांकडून खोदकामात मिळालेली पिवळी हंडी, पितळी कमंडलू (१ किलो ७३१ गॅ्रम), कथिल शिक्के (९४९ ग्रॅम), पितळी धातूचे नाणे (२ किलो ५९३ ग्रॅम) जप्त केले. जप्त नाण्यांची सोनाराकडून तपासणी केली असता ते सोन्याचे नसल्याचा अभिप्राय त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन अनोळखी भोंदूबाबांनी सात जणांकडून एक लाख रुपये घेऊन हे गुप्तधन काढून दिल्याचा जबाब नोंदविला. मात्र या प्र्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गंगापूर तहसीलदारांना पंचनाम्यासाठी  पाचारण केले नाही. 

पोलिसांनी कळविले नाहीपोलिसांना कारवाई करता येते, मात्र गुप्तधन जप्त करताना महसूल अधिकार्‍यासमोर पंचनामा करावा लागतो. गंगापूर तालुक्यातील गुप्तधन जप्त करताना गुन्हे शाखा पोलिसांनी मला कळविले नाही. शिवाय या गुप्तधनाची माहिती पुरातत्व विभागाला देणे पोलिसांना बंधनकारक आहे.- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, गंगापूर