शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीची ऑनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:08 IST

तलवारीची आॅनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट या आॅनलाईन शॉपिंग पोर्टलला गुन्हे शाखेने नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्दे नोटीस पाठवून आठ दिवस उलटले तरी फ्लिपकार्टचे अधिकारी अद्यापही गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत.

औरंगाबाद : तलवारीची आॅनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट या आॅनलाईन शॉपिंग पोर्टलला गुन्हे शाखेने नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले. नोटीस पाठवून आठ दिवस उलटले तरी फ्लिपकार्टचे अधिकारी अद्यापही गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत.

शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून मागविलेल्या तलवारी, चाकू, जांबिया अशी ४१ प्राणघातक शस्त्रे पोलिसांनी नुकतीच जप्त केली. या प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत १७ जणांना अटक केली असून, आरोपी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला.

कोणत्याही प्रकारचे धारदार शस्त्र जवळ बाळगणे, विक्री करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असताना फ्लिपकार्टवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रथम कंपनीच्या संचालकांना नोटीस पाठवून जबाब देण्यासाठी गुन्हे शाखेत हजर होण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या नोटिसांना कंपनीने रजिस्टर्ड पोस्टाद्वारे उत्तर पाठवून दिले. कंपनीचे अधिकारी पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पुन्हा त्यांच्याविरोधात अधिक पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. शोभेची शस्त्रे विक्री करण्याचा कंपनीला अधिकार असल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, कंपनीने वेबसाईटवरून विक्री केलेली आणि प्रत्यक्षात ग्राहकांना मिळालेली ही शस्त्रे धारदार असून शोभेची नाहीत. या शस्त्रांमुळे कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी फ्लिपकार्ट आणि इन्स्टाकार्ट कंपनीच्या संबंधितांविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केली.

मंत्रालयात बैठकगुन्हे शाखेचे अधिकारी आपल्याविरुद्ध अधिक पुरावे जमा करीत असल्याचे कळताच   कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणात लक्ष घालण्याचे सांगितले. त्यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची फाईल घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावले होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शुक्रवारी मंत्रालयात जाऊन औरंगाबाद पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे अधिकाऱ्यांना पटवून दिले. 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस