शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत चमकोगिरी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:26 IST

चौकाचौकात होर्डिंग्ज लावून फुकटछाप चमकोगिरी करणाºयांविरुद्ध महापालिका का कारवाई करत नाही, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात होर्डिंग फाडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराला विद्रूप करणाºया होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. नुकतेच पोलीस आयुक्तांनीही या संदर्भात मनपाने कारवाई करावी यासाठी पत्र लिहिले आहे; पण अजूनही काही चौकांत अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर जसेच्या तसे आहेत.

ठळक मुद्देमनपा : पोलीस आयुक्तांनी पत्र देऊनही होर्डिंग्ज उभेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चौकाचौकात होर्डिंग्ज लावून फुकटछाप चमकोगिरी करणाºयांविरुद्ध महापालिका का कारवाई करत नाही, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात होर्डिंग फाडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराला विद्रूप करणाºया होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. नुकतेच पोलीस आयुक्तांनीही या संदर्भात मनपाने कारवाई करावी यासाठी पत्र लिहिले आहे; पण अजूनही काही चौकांत अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर जसेच्या तसे आहेत.अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांचे पत्र मनपा आयुक्तांकडे गेले आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील अनेक चौक ‘भाऊ, दादा, भय्या, भाई’च्या पोस्टरपासून मुक्त झाल्याचे दिसून आले. मात्र, काही चौकात अजूनही होर्डिंग्ज, बॅनर दिसत आहेत. पद्मपुºयातील अहिल्याबाई होळकर चौकात एका बाजूला अजूनही दिवाळीच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकतेय. क्रांतीनगरातही ‘भाई-भाई’चे वाढदिवसाचे बॅनर, नारळीबाग येथे राजकीय पक्षाचे बॅनर, घाटीत मुख्यद्वारातून आत प्रवेश करताच समोर मोठे डिजिटल बॅनर, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात एक होर्डिंग, सिडकोतील आविष्कार कॉलनी चौकात होर्डिंग दिसून आले. या पोस्टर बॉयवर मनपा कारवाई का करत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.मनपाचे दुर्लक्षअनधिकृत होर्डिंग्जकडे महानगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष असते. पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया औरंगाबाद शहराचे विद्रुपीकरण यामुळे होत आहे. ‘स्वच्छ शहरा’च्या अभियानात होर्डिंग्जची फुकटछाप चमकोगिरी मोठी अडसर ठरत आहे.