शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

औरंगाबाद बनतेय गर्भलिंग निदान, अवैध गर्भपाताचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:35 IST

३० हजार रुपयात गर्भलिंग निदान करणे, तर ४० हजार रुपयांत गर्भपात करणे, असे एकूण ७० हजारांचे ‘पॅकेज’ औरंगाबादेत दिले जाते.

ठळक मुद्दे मुंबईतून थेट येतात औरंगाबादला देशभरातून लोक जातात सुरतला

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : गरिबांना म्हातारपणाचा आधार म्हणून, तर श्रीमंतांना करोडोंची इस्टेट सांभाळण्यासाठी वारसदार म्हणून वंशाचा दिवा पाहिजेच आहे. त्यामुळे पोटात वाढणारा गर्भ मुलीचा आहे की मुलाचा हे जाणून घेण्यासाठी आणि स्त्रीभू्रणहत्या करण्यासाठी मुंबईतील हाय प्रोफाईल लोक थेट औरंगाबादकडे धाव घेत आहेत. मुंबईकर आणि मराठवाड्यातील लोकांसाठी आता गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे केंद्र म्हणून औरंगाबाद शहर ओळखले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबईतील सचिवालयापासून ते आएएस, आयपीएस अधिकारी, राजकीय नेते यांनी या कामासाठी खास जनसंपर्क अधिकारी नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे अवैध धंदे करणाऱ्या डॉक्टरांशी संधान साधले जाते आणि महिलांना विमानाने थेट औरंगाबादला पाठवले जाते. ३० हजार रुपयात गर्भलिंग निदान करणे, तर ४० हजार रुपयांत गर्भपात करणे, असे एकूण ७० हजारांचे ‘पॅकेज’ औरंगाबादेत दिले जाते.

याबाबतीत पुन्हा एकदा बीड जिल्ह्याने आघाडी घेतली असून, तेथे पूर्वी ५०० रुपयांत हे काम व्हायचे, आता त्यासाठी २० हजार रुपये मोजले जातात; पण बीडच्या तुलनेत औरंगाबादला येणे अधिक सोयीस्कर ठरत असल्यामुळे याकामी मुंबईतील लोकांची पहिली पसंती औरंगाबादला मिळत आहे. औरंगाबादपेक्षा तुलनेने दर कमी असल्यामुळे गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपातासाठी देशभरातून सुरतला जाणाऱ्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणांहून सर्वाधिक लोक सुरतला जातात. 

तपासणीकडे दुर्लक्षदर तीन महिन्यांनी सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, तपासणीत सातत्य नसल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी आरोग्य मोहिमांचे कारण अधिकाऱ्यांकडून पुढे केले जाते. त्यामुळे अनधिकृत गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्यांना बळ मिळत आहे. 

गर्भलिंग निदानासाठी पर्यटनबँकॉक, मलेशिया, सिंगापूर याठिकाणी जाऊन गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अशा प्रकारची कृत्ये करण्यासाठी आता नवीनच पर्यटनसंस्कृती रुजते आहे. या देशांमध्ये गर्भलिंग निदान सहज होत असल्यामुळे त्याठिकाणी जाऊन मुलगा आहे की मुलगी हे तपासून यायचे आणि मुलीचा गर्भ असल्यास भारतात येऊन गर्भपात करायचा, असा फंडा ‘हाय प्रोफाईल’ लोकांमध्ये प्रचलित असून, याचे स्तोम दिवसेंदिवस वाढते आहे; पण एका तिकिटाच्या खर्चात औरंगाबादला सर्वच गोष्टी होत असल्यामुळे बँकॉक , मलेशियापेक्षा औरंगाबादला पसंती देणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे.

कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचेगर्भलिंग निदान आणि गर्भपात याबाबतीत मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड अग्रेसर आहे. यामध्ये गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित असा भेदभाव मुळीच नाही. सर्वसामान्यांप्रमाणे श्रीमंत आणि गर्भश्रीमंत लोकही याबाबतील अग्रेसर आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ओळी नुसत्या कागदावरच असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे सगळे फावते. मुली वाचविण्यासाठी राजकीय लोकांनी पुढाकार घेऊन गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात मुलींच्या सुरक्षेसाठीचा अजेंडा लावून धरला पाहिजे. स्त्रीविषयक भूमिका मांडली पाहिजे. - अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :Abortionगर्भपातPregnancyप्रेग्नंसीdoctorडॉक्टर