शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना एक, प्रस्ताव मात्र तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:50 IST

महापालिकेने मागील आठवड्यात शासनाकडे नवीन पाणीपुरवठा योजनेचा नवीन प्रस्ताव सादर केला.

ठळक मुद्देशासनासमोर पेच  कंपनीची भीती कायम

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालय, लवादात प्रलंबित असताना महापालिका, वैधानिक विकास महामंडळाने शासनाकडे एकूण तीन वेगवेगळे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे कोणता प्रस्ताव योग्य आहे, असा प्रश्न शासनाला पडला आहे. नवीन पाणीपुरवठा योजना राबविताना समांतरच्या कंपनीकडून सर्वोच्च न्यायालयामार्फत आडकाठी आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

समांतरचा वाद बाजूला ठेवून शासन आदेशानुसार महापालिका प्रशासनाने दोन वेगवेगळे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केले आहेत. मनपाने १५०० कोटी रुपयांचा आणि २०६० कोटी रुपयांचा दुसरा प्रस्ताव सादर केला आहे. याशिवाय मराठवाडा विकास मंडळानेदेखील राज्यपालांच्या माध्यमातून जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य जलवाहिनी टाकण्याचा ६८२ कोटी रुपयांचा एक प्रस्ताव सादर केल्याची माहिती सोमवारी समोर आली.  महापालिकेने मागील आठवड्यात शासनाकडे नवीन पाणीपुरवठा योजनेचा नवीन प्रस्ताव सादर केला. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर त्याचे सादरीकरणही केले. हा प्रस्ताव १५०० कोटींचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता पालिकेने नगरविकास खात्याकडे एक नव्हे तर दोन प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. पहिला प्रस्ताव १५०० कोटी रुपयांचा आहे. त्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे. तर दुसरा प्रस्ताव २०६० कोटी रुपयांचा असून, त्यात नो नेटवर्क एरिया, वाळूज आदी परिसराचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी एका प्रस्तावाला  शासनाकडून मंजुरी मिळेल, असा विश्वासही घोडेले यांनी व्यक्त केला. प्रस्ताव बाजूला ठेवावा मराठवाडा विकास मंडळात सोमवारी बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौरांसह मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. मनपाने मुख्य जलवाहिनीसोबतच अंतर्गत जलवाहिन्या, जलकुंभ या सर्वांचा एकत्रित प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यामुळे विकास मंडळाचा प्रस्ताव बाजूला ठेवण्याची विनंती नगरविकास खात्याकडे करावी, अशी अपेक्षा महापौरांनी या बैठकीत केली.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार