शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

औरंगाबाद शहरात ४000 मे. टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:11 AM

कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही. आता कचºयाचा प्रश्न न्यायालयात गेला असल्याने महापालिका आणखी निवांत झाली आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे शहरातील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील १३ दिवसांमध्ये ४ हजार मेट्रिक टन जमा झाला. यातील दोनशे ते चारशे मेट्रिक टन कचरा मनपाने उचलला. शहरातील विविध वॉर्डांमध्ये खड्डे खोदून हा कचरा निव्वळ पुरण्यात आला. ही शास्त्रोक्त पद्धत नसल्याची ओरड नागरिकांमधून होऊ लागली. त्यामुळे मनपाने ही प्रक्रिया थांबविली. शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने साथी शहरात दाखल झाले होते. त्यातील लाखो साथी औरंगाबाद शहरात आपल्या नातेवाईकांकडे थांबले आहेत. त्यांनाही शहरातील हे बकाल चित्र पाहून आश्चर्य वाटत आहे. शहरात महापालिका आहे किंवा नाही, असा प्रश्न येणाºया पाहुण्यांना पडला आहे.शहरात साचलेल्या कचºयावर बायोट्रिट पावडर टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोगही अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. दोन लाख नागरिकांना मास्क वाटपचा निर्णय घेण्यात आला. हे मास्क कधी आणि कोणाला वाटले हे सुद्धा मनपा सांगू शकत नाही. कचºयावर तोडगा काढण्याचे सोडून दुसरेच उद्योग महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत.आंदोलन चालूच राहणारऔरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपोत कचरा आणून टाकण्यास विरोध करणारे १४ गावांतील ग्रामस्थांनी सुरू केलेले साखळी उपोषण आंदोलन सुटण्याची चिन्हे नाहीत. कचराकोंडी फुटण्यास काही मार्ग सापडत नसून आंदोलकांचा ११ व्या दिवशीही ठिय्या कायम होता.नारेगाव, मांडकी, कच्चीघाटी, गोपाळपूर, पिसादेवी, महालपिंप्री, रामपूर, वरूड, सुलतानपूर, पीरवाडी, चिकलठाणा, पळशी व अन्य दोन गावांतील ग्रामस्थांनी कचरा डेपो हटावच्या मागणीसाठी पालिकेच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आबालवृद्धांसह महिलादेखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शहरात बहुतांश दुभाजकांवर कचºयाचे ढीग साचले आहेत.मंगळवारी आंदोलकांनी भूमिका विशद करताना सांगितले, मागील ३० ते ३२ वर्षांपासून हा कचरा डेपो येथे आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नापिकी, श्वसनाचे आजार, दम्याचे आजार होत आहेत. ‘करेंगे या मरेंगे’ या भूमिकेने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, असे पुंडलिक अंभोरे, सुनील हरणे, ज्ञानेश्वर सोनवणे, बबनराव वडेकर, अमोल काकडे, मनोज गायके, रवी गायके, भाऊसाहेब गायके, गणेश गायके, बापू गायके, अशोक कुबेर, बद्री अंभोरे, किशोर गायके, बंडू गायके, संजय डक, अहमद शहा, अकबरभाई, रियाज शहा, जगन वडेकर, लालाभाई यांनी सांगितले. नगरसेवक गोकुळ मलके यांच्यावर आंदोलक व नागरिकांनी टीकाकेली. वॉर्डातील कचरा डेपोत न आणता प्रक्रिया करीत असल्याचा नगरसेवक मलके यांचा दावा नागरिकांनी फेटाळला.माशांचा सर्वाधिक धोकाकचºयावर घोंगावणाºया माशा शहरातील १५ लाख नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते कचºयावरील माशा खाद्यपदार्थांवर जाऊन बसल्या, तर निश्चित रोगराई पसरू शकते.मागील काही दिवसांपासून प्रत्येक वसाहतीत कचºयाचे डोंगर साचले आहेत. आता या कचºयातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, परिसरात राहणाºया नागरिकांना अक्षरश: मरणयातनाच सहन कराव्या लागत आहेत.