लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गणेशोत्सवाच्या प्रसादासाठी आणलेला तांदूळ हा प्लास्टिकचा असल्याच्या संशयावरून नायगाव येथे व्यापाºयाला नागरिकांनी धारेवर धरले़ त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या तांदळाचा नमुना घेतला असून प्राथमिक अहवालानुसार हा तांदूळ प्लास्टिकचा नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़नायगाव येथील शहाजी गणेश मंडळाने भंडाºयाचे आयोजन केले होते, परंतु भंडाºयातील तांदूळ न शिजल्यामुळे गणेशभक्तांना हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याचा संशय आला़ यामुळे परिसरातील नागरिकांनी संबंधित व्यापाºयाला धारेवर धरले़ व्यापाºयाने मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी नायगावला भेट देऊन सदर तांदळाचे नमुने घेतले़ हे नमुने अधिक तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल येण्यास आणखी काही दिवस लागतील़
‘त्या’ तांदळाचा नमुना तपासणीसाठी औरंगाबादला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:24 IST