शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

' दशक्रिया ' सिनेमावर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 13:59 IST

दिग्दर्शकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘दशक्रिया’ या चित्रपटातील बंदी आणण्याची याचिका फेटाळून लावली.

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने गुरुवारी केजरीवाल यांच्या लघुपटावरील दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांच्या पीठाने दिला निर्णय पैठण येथील पुरोहित संघाने ' दशक्रिया' चित्रपटातीलअनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे व संदर्भहीन असल्याने ते वगळावेत आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालावी अशी विनंती करणारी याचिका सादर करण्यात आली होती

औरंगाबाद : दिग्दर्शकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘दशक्रिया’ या चित्रपटातील बंदी आणण्याची याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी केजरीवाल यांच्या लघुपटावरील दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांच्या पीठाने हा निर्णय शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी झालेल्या सुनावणीत दिला.

पैठण येथील पुरोहित संघाने ' दशक्रिया' चित्रपटातीलअनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे व संदर्भहीन असल्याने ते वगळावेत आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालावी अशी विनंती करणारी याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली होती. यावर आज सकाळी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी तसेच संतोष छडीदार, गोवर्धन छडीदार यांनी ही याचिका सादर केली आहे. साहित्यिक बाबा भांड यांनी १९९४ मध्ये लिहिलेल्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती कल्पना विलास कोठारी यांनी केली असून, पटकथा, संवाद आणि गीते संजय पाटील यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे.

ज्या बाबी कादंबरीत नाहीत त्या या चित्रपटात चित्रित करण्यात आल्या आहेत. जे पुरोहित दशक्रिया विधी करतात त्यांना चित्रपटात धर्मभ्रष्ट संबोधण्यात आलेले आहे. नाभिक समाजाबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आलेली आहे. हे क्रियाकर्म करणारे नाभिक, पुरोहित अल्पसंख्य असून, त्यांना दलाल असे संबोधण्यात आलेले आहे. या बाबी आपल्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण असून, याला आक्षेप घेणारे तक्रार अर्ज राज्याचे गृहमंत्री, सांस्कृतिकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, डीएसपी तसेच तहसीलदार, पैठण यांच्याकडे करून, कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.

काय होती याचिका?

याचिकेत म्हटले होते की, याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात शिक्षण तसेच प्रशिक्षण घेतलेले असून, ते त्यानुसारच काम करतात. ते त्यांचे उपजीविकेचे साधन आहे आणि यात आक्षेप घेण्यासारखेही काही नाही. घटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आहेत. गरुडपुराण, निर्णयसंहिता, धर्मसिंधू, अंत्येष्टी संस्कार आदी ग्रंथांमध्ये याबाबत लिहिलेले आहे. हे थोतांड नसून, हिंदू संस्कृती आणि परंपरेने चालत आलेला महत्त्वाचा विधी आहे.  पैठण शहर आणि यातील काही ठिकाणांबद्दलही चित्रपटात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेले आहे. धार्मिक भावनेने लोक हा विधी करण्यासाठी येतात, पुरोहितवर्ग त्यांच्याकडे जात नाही. या विधीला लूट असेही संबोधण्यात आलेले आहे. हिंदू धर्माच्या धार्मिक भावना, दुखावल्या जातील अशी वक्तव्ये, चित्रीकरण यात करण्यात आलेले आहे. या चित्रपटामुळे समाजात तणाव निर्माण होण्याचीही शक्यता आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीकांत अदवंत व अ‍ॅड. नेहा कांबळे हे काम पाहत आहेत.