शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:42 IST

राज्याच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांमधील भ्रष्टाचाराची चौकशी व दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. 

औरंगाबाद : राज्याच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांमधील भ्रष्टाचाराची चौकशी व दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. 

राज्याच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी शेतकर्‍यांना फुलशेती, फळबाग, शेत तलावासाठी लागणारे सर्व साहित्य मोफत दिले जाते. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या  जिल्ह्यांत सदर योजना राबविण्यासाठी अहमदनगर येथील ‘पर्यावरण रिसोर्स सेंटर’ या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. सदर संस्था ही औरंगाबादेतील एकात्मिक आदिवासीे विकास प्रकल्प अधिकारी या कार्यालयाच्या देखरेखीखाली काम करीत आहे. सदरील संस्थेने २०१२-१३ पासून लाभार्थी आदिवासी शेतकर्‍यांना वरील कामांसाठी आवश्यक ते साहित्य पुरविणे अपेक्षित होते. 

मात्र, ही योजना वरील चार जिल्ह्यांत राबविण्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातून मोठ्या प्रमाणात बनावट बिले सादर करून उचललेल्या पैशाचा विनियोग संस्थेने स्वत:साठी करून आदिवासी लाभार्थी व शासनाची फसवणूक केल्यासंदर्भात कन्नड तालुक्यातील भीमा अंबू पथवे यांनी अ‍ॅड. डी. बी. पवार मार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेची पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादHigh Courtउच्च न्यायालय