शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची पुण्याच्या युनायटेड संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:23 IST

साईप्रसाद नायडू आणि आकाश बोराडे यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर औरंगाबादने आज एडीसीए मैदानावर एमसीएच्या अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या युनायटेड एस.सी. संघावर ६ गडी राखून मात केली. युनायटेड एस. सी. संघाने प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकांत ८ बाद २५७ धावा फटकाल्या.

औरंगाबाद : साईप्रसाद नायडू आणि आकाश बोराडे यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर औरंगाबादने आज एडीसीए मैदानावर एमसीएच्या अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या युनायटेड एस.सी. संघावर ६ गडी राखून मात केली.युनायटेड एस. सी. संघाने प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकांत ८ बाद २५७ धावा फटकाल्या. त्यांच्याकडून शिवेंद्र भुजबळ याने ८६ चेंडूंत ७ चौकारांसह सर्वाधिक ७३ धावा केल्या. गौरव शिंदेने ५६ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५१ व अथर्व गायकवाडने ७७ चेंडूंत ६ चौकारांसह ४७ धावा केल्या. औरंगाबादकडून हरमीतसिंग रागी याने ४९ धावांत ३ गडी बाद केले. करण लव्हेरा आणि ओमकार गुंजाळ यांनी प्रत्येकी २, तर आदर्श बागवाले याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात औरंगाबादने विजयी लक्ष्य ४८ षटकांत ४ गडी गमावून गाठले. औरंगाबादकडून साईप्रसाद नायडू याने १0५ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ७४ व आकाश बोराडे याने ८४ चेंडूंतच ९ चौकार व एका षटकारासह ७३ धावांची सुरेख खेळी केली. विश्वास वाघुले याने २५ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद २७ व आकाश पाटीलने ४३ चेंडूंतच ४ चौकार व एका षटकारासह ४0 धावांचे योगदान दिले.संक्षिप्त धावफलकयुनायटेड एस. सी., पुणे : ५0 षटकांत ८ बाद २५७.(शिवेंद्र भुजबळ ७३, गौरव शिंदे ५१, अथर्व गायकवाड ४७. हरमितसिंग रागी ३/४९, करण लव्हेरा २/४८, ओमकार गुंजाळ २/३५, आदर्श बागवाले १/५0).औरंगाबाद : ४८ षटकांत ४ बाद २६१. (साईप्रसाद नायडू नाबाद ७४, आकाश बोराडे ७३, आकाश पाटील ४0, विश्वास वाघुले नाबाद २७. शिवम पांडुरंग २/३८).

टॅग्स :T20 Cricketटी-20 क्रिकेट