शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील लढत होणार तिरंगी, चौरंगी की पंचरंगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:54 IST

काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीचे चित्र सध्या तरी औरंगाबाद मतदारसंघात दिसते. हर्षवर्धन जाधव आणि अब्दुल सत्तार हे दोन आमदार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेतात यावरुन ही लढत तिरंगी की पंचरंगी हे निश्चित होईल.

- नजीर शेखऔरंगाबाद : काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीचे चित्र सध्या तरी औरंगाबाद मतदारसंघात दिसते. हर्षवर्धन जाधव आणि अब्दुल सत्तार हे दोन आमदार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेतात यावरुन ही लढत तिरंगी की पंचरंगी हे निश्चित होईल. एमआयएमच्या निर्णयाने या मतदारसंघाची समीकरणे कशी बदलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेनेने विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने आ. सुभाष झांबड यांना मैदानात उतरविले आहे. सोमवारी रात्री एमआयएमने आ. जलील यांची उमेदवारी जाहीर केली. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही आपल्या शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे उमेदवारी दाखल करण्याचे घोषित केले आहे. याशिवाय आ. झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज असलेले आ. अब्दुल सत्तार यांनीही अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आ. जाधव आणि आ. सत्तार उभे राहिल्यास मतदारसंघात पंचरंगी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे.खैरेंविरुद्धच्या मागील चार लढतींमध्ये काँग्रेसने प्रत्येक वेळी नवा उमेदवार दिला आहे. यापूर्वी चार वेळा दिवंगत नेते बॅ. ए.आर. अंतुले, रामकृष्णबाबा पाटील, उत्तमसिंग पवार आणि नितीन पाटील यांना उमेदवारी दिली. आता आ. झांबड उभे ठाकले आहेत.या मागील चार निवडणुकांतील अपयशषनंतरही काँग्रेस पक्षाकडून ही जागा जिंकण्याबाबत व्यूहरचना होत आहे, असे चित्र दिसत नाही. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना २०१४ मध्ये निवडून आल्यानंतरच २०१९ मध्येही आपल्यालाच लढायचे आहे, याची खात्री होती. काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या वर्षभर आधी उमेदवारांची चाचपणी आणि चर्चा सुरू होऊन अनेक इच्छुकांपैकी शेवटी एकाला उमेदवारी मिळत असल्याचे चित्र आहे. मग अनेक जण नाराजीचा सूर लावतात. काँग्रेसच्या या निर्णयप्रकियेचा अर्थातच शिवसेनेला अधिक फायदा होताना दिसतो. यंदाही आ. झांबड यांची उमेदवारी घोषित होताना आ. सत्तार यांनी बंडाची भाषा केलीच. आता वंचित आघाडीकडून आ. जलील यांची उमेदवारी घोषित झाल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे. राष्टÑवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले आ. सतीश चव्हाण मंगळवारच्या दोन्ही पक्षांच्या एकत्रित मेळाव्याला गैरहजर होते. त्यामुळे त्यांची आ. झांबड यांना किती साथ मिळते, हेही पाहावे लागेल.सद्य:स्थितीत औरंगाबाद मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम हे तीन पक्ष मैदानात असणार आहेत, हे स्पष्ट होत आहे. शिवसेना आणि काँग्रेसने प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे. अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली नाही. आ. जाधव आणि आ. सत्तार उमेदवारी अर्ज भरतात की नाही आणि दाखल केलेली उमेदवारी परत घेतात की नाही, यावर मतदारसंघात तिरंगी, चौरंगी की पंचरंगी लढत होणार हे स्पष्ट होईल.निवडणुकीच्या आधीपासून आ. हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंवर शरसंधान करीत आपली उमेदवारी आधीच घोषित केली आहे. ते ३० एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. खैरेंचा विरोध हाच एकमेव निकष त्यांच्या उमेदवारीमागे आहे. दुसरीकडे आ. सत्तार यांनी जाहीर केलेली बंडखोरी किती दिवस राहते, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीला औरंगाबादेतील उच्चशिक्षित मुस्लिम आणि मौलानांनी काही दिवसांपूर्वी विरोध दर्शविल्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीत नसणार हे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, सोमवारी रात्री पुन्हा त्यांची उमेदवारी जाहीर केली गेली.देशातून भाजपचे सरकारहद्दपार व्हावे, असे वाटणारा मुस्लिम वर्ग आता एमआयएमच्या उमेदवारीकडे कसे पाहतो,हेही महत्त्वाचे ठरणार आहे. एमआयएमच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होईल, या आरोपाचा आ. जलील यांनी इन्कार करीत आम्हीनव्हतो तेव्हाही काँग्रेसचापराभव होत होता, असेस्पष्ट केले आहे.मागील चार निवडणुकांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसलेली आहे. खा. खैरे यांच्याबाबतीत निवडणुकीच्या आधी विरोधी वातावरण असल्याचे चित्र निर्माण तयार होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत ते विजयी होत आल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९