शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील ए एस क्लब-साजापूर चौफुली रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:07 IST

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वी मुंबई-नागपूर महामार्गाचे काम करण्यात आले आहे. सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उखडल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. साईड पंख्याचीही दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपासून तर अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला असून, अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. खडड््यामुळे ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

तुकडे पाडून रस्त्याचे काम...महामार्गाची दुरावस्था व वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून लासूर ते ए एस क्लब लिंक रोड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ६ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचे १९ सप्टेंबरला आ. प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे. मात्र, रस्त्याचे तुकडे पाडून काम केले जात असल्याने साजापूर चौफुली ते ए एस क्लब लिंक रोड चौक रस्त्याचे काम लांबणीवर पडले असून हे काम प्रत्यक्षात केव्हा सुरु होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्याचे काम लवकर करावे ..रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने रस्त्याचे काम हाती घेवून लवकर पूर्ण करावे, असे तीसगावचे ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक