औरंगाबाद : कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ९ पदकांची कमाई केली.औरंगाबादच्या शरद पवार याने फुम्से प्रकारात रौप्य तर पेअर गटात प्रतीक जांभूळकर व अंतरा हिरे यांनी कास्यपदक जिंकले. क्युरेगी (फाइट) या गटात राधिका शर्मा व प्रेम पेहारकर यांनी रौप्यपदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे सागर वाघ, अंतरा हिरे, प्रीती खरात यांनीही कास्यपदकाची कमाई केली. या संघासोबत आशिष बनकर व सुमित शुक्ला यांनी अनुक्रमे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के. डी. शार्दुल, राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, जिल्हा संघटनेच्या सचिव लता कलवार, अमोल थोरात, शरद तिवारी, संतोष सोनवणे, योगेश विश्वासराव, अविनाश नलावडे, गजेंद्र गवंडर, राजू जाधव, धनंजय बागल, चंद्रशेखर जेऊरकर, डोनिका रूपारेल, प्रवीण वाघ आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादला ९ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:06 IST