शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, कोरोना प्रतिबंधात्मक लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 18:58 IST

corona patients under the age of 18 increased कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलांमधील कोरोनाचे स्वरूप मध्यम स्वरूपाचे होते.

ठळक मुद्देचिंतेत असणाऱ्या पालकांचा मुलांची काळजी घेण्यावर भर१८ वर्षांखालचे ७ हजारांवर रुग्ण, पण लसच उपलब्ध नाही

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. औरंगाबादेत एकूण रुग्णांपैकी १०.८४ टक्के म्हणजे साधारण ११ टक्के रुग्ण हे १८ वर्षांखालील आहेत. परंतु या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. परिणामी, पालकांची चिंता वाढत आहे.

औरंगाबादेत गेल्या २० दिवसांत ५ बालकांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलांमधील कोरोनाचे स्वरूप मध्यम स्वरूपाचे होते. परंतु गेल्या काही दिवसांत मुलांमध्येही कोरोनाचे गंभीर स्वरूप पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे गंभीर लक्षणे टाळण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे. परंतु त्यापेक्षा लहान मुलांचे काय, असा सवाल पालकांतून उपस्थित केला जात आहे. या वयोगटातील मुलांना लस मिळण्यासाठी किमान २ ते ३ महिने लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुलांची काळजी घेण्याचा, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत....० ते १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी सध्या ट्रायल सुरू आहे. आगामी काही महिन्यांत या वयोगटासाठीही लस उपलब्ध होण्याची आशा आहे. परंतु तोपर्यंत मुलांची, विशेषत: लहान बालकांची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. लहान मुलांत काही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मुले घरातच राहतील, याची काळजी घेण्याची गरज आहे. होम आयसोलेशनमध्ये जर कोणी असेल तर त्यांच्यापासून मुलांना दूर ठेवले पाहिजे. मुले ही सुपर स्प्रेडर असतात. त्यामुळे लस येईपर्यंत काळजी घेतली पाहिजे. मुले घराबाहेर मास्कशिवाय खेळत असतात. पण मुलेही मास्क वापरतील, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे बालरोगतज्ज्ञ डाॅ. रेणू बोराळकर म्हणाल्या.

१८ वर्षांखालचे ७ हजारांवर रुग्ण, पण लसच उपलब्ध नाही- औरंगाबादेत आतापर्यंत १८ वर्षांपर्यंतच्या ७ हजार ९७० जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. औरंगाबादेतील एकूण रुग्णांपैकी हे प्रमाण १०.८४ टक्के इतके आहे. यात सर्वाधिक संख्या ही ५ ते १८ वर्षांपर्यंतच्या रुग्णांची आहे.- शहरात ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ११५४ बालकांना कोरोनाची बाधा झाली, तर ५ ते १८ या वयोगटात ६८१६ जणांना कोरोनाने गाठले.- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या दोन्ही वयोगटातील काही बालकांचे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. अवघ्या २० दिवसांतच ५ बालकांचा मृत्यू झाला.- ० ते १८ या वयोगटात मृत्यूचे प्रमाण ०.२ ते ०.४ टक्के असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मृत्यूदर कमी असला तरी पहिल्या लाटेपेक्षा आता या वयाेगटातील अधिक मुले बाधित होत आहेत.

१८ ते ५० वर्षामधील ६० टक्के रुग्ण, १८ वर्षावरील लोकांना लवकरच लस- औरंगाबादेत १८ ते ५० वर्षांमधील एकूण रुग्णांचे प्रमाण ६०.२० टक्के आहे. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल ४४ हजार २४९ रुग्ण आढळून आलेले आहेत.- आतापर्यंत केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात होती. परंतु आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे आता केवळ ० ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लस