शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बैजू पाटील यांच्या छायाचित्रांचा लंडनमध्ये लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 04:56 IST

जागतिक व्याघ्र संरक्षण मोहिमेमध्ये भारताला मोठा बहुमान मिळाला आहे.

औरंगाबाद : जागतिक व्याघ्र संरक्षण मोहिमेमध्ये भारताला मोठा बहुमान मिळाला आहे. वन्यजीव छायाचित्रणात ३५ पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉल येथे फोटो प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.१८ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान ‘आय आॅन द टायगर’ या नावाने हे प्रदर्शन भरणार आहे. जागतिक किर्तीच्या १० वन्यजीव छायाचित्रकारांनी टिपलेली वाघांची ८० दुर्मीळ छायाचित्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येतील. या प्रदर्शनात बैजू यांची ६ छायाचित्रे असतील. जागतिक व्याघ्र संरक्षण मोहिम राबवणाऱ्या ‘द क्लिंटन पार्टनरशिप’ या संस्थेने जगातील १५० श्रीमंत व्यक्तींनाही या प्रदर्शनात आमंत्रित केले आहे.>करिअरमधील सर्वात सोनेरी क्षण२५ वर्षांपासून वन्यजीव छायाचित्रणात नावलौकिक मिळवलेल्या बैजू पाटील यांनी रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपल्या छायाचित्राचे प्रदर्शन होणे हे करिअरमधील सर्वात सोनेरी क्षण असल्याचे सांगितले. माजी खा. व लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले.छायाचित्रांच्या लिलावाद्वारे मिळणाºया निधीचा वापर भारतातील व्याघ्र संरक्षण मोहिमेसाठी सुद्धा होणार आहे.