शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:43 IST

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अतुल सावे यांचा राज्य मंत्रिमंडळात शनिवारी समावेशाचा निर्णय झाला. सावे यांना ...

ठळक मुद्देभाजपचा जल्लोष : ओबीसी समाजाला अखेर न्याय

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अतुल सावे यांचा राज्य मंत्रिमंडळात शनिवारी समावेशाचा निर्णय झाला. सावे यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याची वार्ता शहरात पसरताच भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर अभिनंदनाच्या अनेक पोस्ट पडू लागल्या.२०१५ मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना विधानसभेचे सभापतीपद देण्यात आले. पूर्व विधानसभा मतदारसंघातील आ. अतुल सावे, गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांच्यापैकी एकाला तरी मंत्रिमंडळात संधी मिळेल, असा अंदाज होता. मात्र दोघांनाही भाजपने स्थान दिले नाही. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ओबीसी चेहरा असलेले अतुल सावे यांना शुक्रवारी अचानक मुंबईला बोलावण्यात आले. सावे यांची मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने शनिवारी घेतला. दुपारपासूनच शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित झाला होता. ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला. सावे यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते सायंकाळीच मुंबईला रवाना झाले.शुभेच्छांचा वर्षावआ. अतुल सावे राज्यमंत्री झाल्याचे कळताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. त्यांच्या पुंडलिकनगर, सिडको एन-६ येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली. या ठिकाणी पेढे वाटप सुरू होते.भाजपचे सोशल इंजिनिअरिंगआगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने औरंगाबादला झुकते माप दिले आहे. मागील महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यात बहुजन वंचित आघाडीने अनेक विधानसभा मतदारसंघांत आपला दबदबा निर्माण केला आहे. अतुल सावे ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सेना-भाजप युतीने ओबीसी मतदारांना आकर्षित केले आहे.चांगल्या कामाची पावतीमागील साडेचार वर्षांमध्ये नागरिकांची अनेक कामे केली. पक्षसंघटनेतही जोरदार काम करण्यात आले. आपण केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षनेतृत्वाने राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले. पूर्व विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यात येईल.अतुल सावे, आमदार

टॅग्स :Governmentसरकारministerमंत्री