शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून बिडकीन, पैठण, सोलापूर-धुळे महामार्गावरील वाहतुकीत बदल

By सुमित डोळे | Updated: May 10, 2024 13:54 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामानिमित्त आजपासून बिडकीन शहरातून जड वाहतुकीस बंदी

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामानिमित्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे सध्या जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पैठण बिडकीन या मुख्य मार्गावर या जलवाहिनीसह रस्त्याचेही काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. ही बाब लक्षात घेत पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी १० मेपासून पुढील आदेश येईपर्यंत बिडकीन शहरातून जाणारी सर्व जड वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

असा असेल बदल-छत्रपती संभाजीनगरकडून पैठणकडे जाणारी जड वाहने छत्रपती संभाजीनगर, निलजगाव फाटा, एल.अँड टी मार्गे डीएमआयसी रोड मार्गे पैठणकडे जातील व येतील.-जालना रोडवरील करमाड मार्गे कचनेर कमान, कचनेर गाव पोरगाव फाटा, बिडकीन, निलजगाव फाटा, बिडकीन, शेकटा फाटा, इसारवाडी फाटा ते अहमदनगरकडे जाणारी जड वाहने आता जालना रोड, करमाड, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, अंबिका हॉटेल, सोलापूर-धुळे महामार्गावरून गांधेली, सातारा, ए.एस. क्लब मार्गे अहमदनगर किंवा धुळे, नाशिककडे जातील.-अहमदनगर, इसारवाडी फाटा, बिडकीन, कचनेर कमान, करमाड मार्गे जालनाकडे जाणारी जड वाहतूक अहमदगनर-पुणे रोडवरील इसारवाडी फाटा, वाळूज, ए.एस. क्लब चौकातून सोलापूर, धुळे महामार्गावरून सातारा, गांधेली, आडगाव, हॉटेल अंबिका, झाल्टा फाटा, केंब्रिज चौक ते जालनाकडे जातील.-साेलापूर-धुळे मार्गाने कचनेर कमान, पोरगाव फाटा, एल.अँड टी. कंपनी, बिडकीन, शेकटा फाटा, इसारवाडी फाटा ते अहमदनगर पुणेकडे जाणारी जड वाहतूक अहमदनगर पुणे रोडवरील इसारवाडी फाटा, वाळूज, ए.एस. क्लब, सोलापूर-धुळे महामार्गावरून सातारा, गांधेली, निपाणी, कचनेर कमानीकडून सोलापूरकडे जातील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग