शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश

By साहेबराव हिवराळे | Updated: July 11, 2024 19:31 IST

वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती; वनसंपदेचीही निगा

छत्रपती संभाजीनगर : गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. पावसाळ्यात वन परिक्षेत्रात नवनवीन वृक्षांच्या बिया रुजण्याच्या अवस्थेत असतात. या कोवळ्या रोपांवर पर्यटकांची पावले पडल्यास ती रोपे नष्ट होतात. परिणामी, नवीन वृक्षसंपदा वाढीस लागण्यात अडथळा येतो. यासोबतच पावसाळ्याचे तीन महिने हे जवळपास सर्वच पशुपक्षी, कीटकांच्या विणीचा हंगाम असतो. पर्यटकांच्या उपस्थिती आणि हस्तक्षेपामुळे त्यांच्या क्रियेत बाधा उत्पन्न होते. यामुळे त्यांच्या वंशवाढीतही बाधा उत्पन्न होते. पर्यटक मंडळी वनक्षेत्रात मोठमोठ्याने आवाज करतात. यामुळे हे जीव घाबरतात. वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती वाढली असल्याने खबरदारी गरजेची आहे.

व्यवस्थापन आराखड्यातील तरतूद-वन्यजीव विभागाचे दर दहा वर्षांसाठी व्यवस्थापन आराखडा मंजूर करण्यात येतो.- २०१४-१५ ते २०२४-२५ या दहा वर्षांसाठीच्या व्यवस्थापन आराखड्यातील बाब क्रमांक ३. ६ नुसार 

गौताळा औट्रमअभयारण्यात तीन महिने प्रवेशास बंदी ठेवण्याची तरतूद आहे. या दोन कारणांखेरीज गौताळा वन परिक्षेत्रात अनेक धोकादायक स्थळे आहेत. नदी, नाले, दरी, मोठी झाडे यामुळे पावसाळ्यात पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. म्हणून मागील वर्षीपासून ही बंदी करण्यात येते.

वनसंपदा संरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मागील वर्षी बंदी असूनही अनेक पर्यटकांनी गौताळ्यात पर्यटन केले होते. पर्यटक केरकचरा, अस्वच्छता, प्लास्टिक वस्तू टाकून पर्यावरणास धोका निर्माण करतात.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव संरक्षक

दक्षता घ्या..पर्यटकांनी स्वत:च्या आणि वन्यजिवांच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी.- एम. बी. नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग