शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न- अशोकराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:52 IST

शासनाचे कारखानदाराविरोधी धोरण, पाण्याची कमतरता या अडचणीतून काटकसरीने सामान्य सभासदांचे हित केंद्रबिंदू ठरवून भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाने उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा खा़अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर : शासनाचे कारखानदाराविरोधी धोरण, पाण्याची कमतरता या अडचणीतून काटकसरीने सामान्य सभासदांचे हित केंद्रबिंदू ठरवून भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाने उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा खा़अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केले़२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाच्या २२ व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम येळेगाव येथील कारखाना साईटवर आयोजित करण्यात आला होता़ अध्यक्षस्थानी खा़अशोकराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ़डी़पी़सावंत, माजी आ़माधवराव जवळगावकर, माजी आ़हणमंत पाटील बेटमोगरेकर हे उपस्थित होते़खा़अशोकराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, नोटाबंदी, जीएसटी व कर्जमाफीच्या केवळ घोषणाबाजीमुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार कागदांची पूर्तता करण्यात अजूनही लाईनमध्येच उभा आहे़ शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, त्यासाठी काँग्रेसचा संघर्ष चालूच राहील़ त्यासाठी काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन उभारले आहे़ शेतकºयांच्या ट्रॅक्टरला २८ टक्के जीएसटी तर श्रीमंताच्या मर्सीडीजला ६ टक्के जीएसटी म्हणजेच हे शासन शेतकºयांच्या विरोधात असून या शासनाला पायउतार केल्याशिवाय काँग्रेसचा संघर्ष चालूच राहील असे सांगितले़माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात शासनाच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेत महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडकरांनी जे परिवर्तन घडवून आणले, त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये उत्साह वाढल्याचे सांगितले़ यापूर्वी काँग्रेस सरकारने कर्जमाफीचा ऐतहासिक निर्णय घेतला होता़ पण सध्याचे सरकार केवळ घोषणाबाजी करून प्रत्यक्षात कर्जमाफी न करता आश्वासनांची खैरात करीत आहेत़ अशोकराव चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वावामुळे कारखान्याने अनेक पारितोषिक मिळवून उच्चांक गाठल्याचे सांगितले़ यावेळी माजी आ़हणमंत पाटील, आ़डी़पी़सावंत यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक भाषणात चेअरमन गणपतराव तिडके यांनी कारखान्याने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेवून अधिकाधिक ऊस लागवड करण्याचे सभासदांना आवाहन केले़यावेळी नरेंद्र चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, चेअरमन बी़आरक़दम, माणिकराव इंगोले, संजय लहानकर, जगदीश पाटील, उपमहापौर विनय गिरडे, किशोर भवरे, केशवराव इंगोले, पप्पू कोंढेकर, आनंद चव्हाण ,अब्दुल सत्तार, संजय लोणे, सुनील अटकोरे, कार्यकारी संचालक श्याम पाटील, नीळकंठ मदणे, सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराय तर आभार व्हा़चेअरमन कैलाश दाड यांनी मानले़