लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीचा विस्तार होत असताना आता त्या परिसरात अँकर प्रोजेक्ट (मोठा उद्योग) यावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी नमूद केले.शेंद्र्यातील विविध सुविधांबाबत बागडे यांनी सीएमआयए (चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर) च्या पदाधिकारी आणि उद्योजकांशी चर्चा केली. या बैठकीसाठी स्टरलाइट कंपनीने पुढाकार घेतला. बैठकीत शेंद्रा परिसरात अँकर प्रोजेक्ट आणण्यासंबंधी चर्चा झाली. ईएसआयसी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र एमआयडीसीत व्हावे. एमईसीसीद्वारे सॉलिड वेस्टची विल्हेवाट लावण्यासंबंधीही बैठकीत चर्चा झाली. सीएमआयएने एकत्रित निवेदन द्यावे, सर्व प्रश्न सोडविण्यासंबंधी प्रयत्न करणार, असे आश्वासन बागडे यांनी दिले.यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उपाध्यक्ष रितेश मिश्रा, उद्योजक उल्हास गवळी, सहसचिव कमलेश धूत, स्कोडाचे वेद जहागीरदार, स्टरलाइटचे राम पाटील, मयूर ठक्कर, मिलिंद धर्माधिकारी, वोक्हार्टचे एम. बी. मानवतकर, रॅडिकोचे एस. जी. पाटील, हिंडाल्कोचे प्रकाश जाधव, डी. पी. देशपांडे, सचिन एकार, धनंजय मेटल क्राफ्टचे तुकाराम कंदाकुरे, मिलिंद पाटील, लॅमिफॅबचे रमेश धूत, रवी मसालेचे निखिल जैन, ग्रीव्हज कॉटनचे बसवराज मोरखेडे, हर्मन फिनोकेमचे निशिकांत घाटे यांची उपस्थिती होती. कमलेश धूत यांनी स्वागत केले, तर उत्सव माछर यांनी आभार मानले.उद्योजकांतर्फे यावेळी एमआयडीसीत आणि गैरएमआयडीसीत जमीन देण्यात यावी, २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, बोअरवेल्स घेण्याची परवानगी मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शेंद्रा एमआयडीसीत अँकर प्रोजेक्ट आणण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:32 IST