शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

....तर राज्यात तलाठ्यांवर शेतकऱ्यांकडून होतील हल्ले

By admin | Updated: April 26, 2016 00:09 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा देणे, त्यांच्या पीक कर्जाच्या बोजांची नोंद घेणे, खातेफोड करण्याची कामे वेळेत होत नसल्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झालेला आहे.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा देणे, त्यांच्या पीक कर्जाच्या बोजांची नोंद घेणे, खातेफोड करण्याची कामे वेळेत होत नसल्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास ते सर्वप्रथम तलाठ्यांवर हल्ले करतील, अशी भीती राज्य तलाठी- पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. विविध मागण्यांसाठी महासंघाने २६ एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला असून, राज्यात ३ हजार ८४ स. जा. वाढविणे, आॅनलाईन सातबारा योजनेतील सॉफ्टवेअर बदलण्यासह तलाठ्यांना पायाभूत सुविधा पुरविणे, तलाठी कार्यालय बांधणे, या तीन मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या तरच संप मागे घेण्याचा विचार होईल, असेही कोकाटे, डुबल यांनी स्पष्ट केले. १२ हजार ६३७ तलाठी आणि २१०० मंडळाधिकारी, ४०० नायब तहसीलदार संपात सहभागी होणार आहेत. पाणीपुरवठा आणि चारा छावण्यांची जबाबदारी असलेले तलाठी या संपातून वगळण्यात आल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. आॅनलाईन सातबारा देण्यासाठी सुविधा नाहीत. १ एप्रिलपर्यंत पूर्ण राज्यात आॅनलाईन सातबारा करण्याची मुदत होती. राज्यात ३५८ पैकी २१६ तालुक्यांत सातबाराचे काम आॅनलाईन झाले आहे. ३६ तालुके बाकी आहेत. एनआयसीकडे स्पेस नसल्यामुळे त्यांनी खातेदारांच्या सीडी अपलोड केल्या नाहीत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सातबारा आॅनलाईन करण्याचे काम ठप्प आहे. त्याला कारण म्हणजे सुविधा दिल्या जात नाहीत, असे कोकाटे म्हणाले. या पत्रकार परिषदेला सरचिटणीस सतीश तुपे, तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी, रिता पुरी आदींची उपस्थिती होती. प्रधान सचिवांनी केली विनवणीप्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी फ ोनवरून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याबाबत विनंती केली. महासंघाकडून कोकाटे यांनी श्रीवास्तव यांना तलाठ्यांना काम करण्यात येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन ४ वर्षांपासून सुरू असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेची मागणी केली. एनआयसी ही संस्था सरकारला जुमानत नाही, स. जा. वाढविले तरी कर्मचारी भरतीचा विचार सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन केला जाईल. राज्यभर तलाठ्यांवर हल्ले होत आहेत. त्यांना जाळण्याची भाषा केली जात आहे. ग्रामविकास, विक्रीकर विभागातील पदे भरली जातात. मग महसूलमध्येच भरती का होत नाही. ११६ कोटी रुपयांचा खर्च वाढीव सजांवर होणार आहे. त्या तुलनेत तिप्पट महसूलदेखील मिळणार आहे. अशा प्रकारची चर्चा प्रधान सचिव आणि महासंघ पदाधिकाऱ्यांमध्ये झाली.