शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण पथकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:53 IST

मिल कॉर्नर भागातील बारापुल्लागेटजवळ नाल्यात एका महिलेने मनपाच्या जागेवर ३० बाय ६० आकाराचे अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी आज दुपारी मनपाचे पथक पोहोचले असता अतिक्रमण केलेल्या महिलेने पोलीस निरीक्षक, इमारत निरीक्षकांवर चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेने पोलिसांच्या अंगावर रॉकेल ओतण्याचाही प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मिल कॉर्नर भागातील बारापुल्लागेटजवळ नाल्यात एका महिलेने मनपाच्या जागेवर ३० बाय ६० आकाराचे अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी आज दुपारी मनपाचे पथक पोहोचले असता अतिक्रमण केलेल्या महिलेने पोलीस निरीक्षक, इमारत निरीक्षकांवर चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेने पोलिसांच्या अंगावर रॉकेल ओतण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मोठा पोलीस बंदोबस्त मागवून अखेर महिलेचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.बारापुल्ला गेटच्या बाजूला खाम नदी वाहते. या नदीच्या पात्रात एक मोठी तटरक्षक भिंत आहे. या भिंतीला लागूनच एका महिलेने ३० बाय ६० आकाराचे अतिक्रमण आठ दिवसांपूर्वी केले. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने त्वरित हे अतिक्रमण काढून घ्यावे, अशी सूचना केली होती. यापूर्वी एकदा मनपाचे पथक तेथे पोहोचले असता महिलांनी पथकाला पिटाळून लावले होते. शुक्रवारी मनपाचे पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद आणि पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी मोठा फौजफाटा घेऊन दुपारी १२.३० वाजता बारापुल्लागेट येथे अतिक्रमण काढण्यास दाखल झाले. अतिक्रमणाच्या जागेवर आठ ते दहा महिला उभ्या होत्या. त्यांनी महापालिकेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाºयांना प्रचंड शिवीगाळ केली. त्यांची बरीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी काहीच उपयोग झाला नाही. एका महिलेने पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि इमारत निरीक्षक जमशीद यांच्या अंगावर रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला. लगेचच दुसºया महिलेने चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. महिलांची ही दबंगगिरी पाहून पोलीसही क्षणभर अवाक झाले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सर्व महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये लोखंडी पत्र्याचे शेड निष्कासित करण्यात आले.रात्री उशिरा मनपातर्फे बेगमपुरा पोलीस ठाण्यात संबंधित महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये शबाना बेगम, सुनीता आठवले, रंजना अहिरे, नीता गायकवाड, वत्सलाबाई गडकर, सना जावेद खान व अन्य चार तेपाच महिलांचा आरोपींत समावेश आहे.