शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

हल्लाबोलचा धसका; औरंगाबादची नियोजन बैठकच रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाºया नियोजन विभागाच्या बैठकीला ब्रेक लागला आहे. आता ही बैठक सोमवारी होणार असून, हल्लाबोलच्या धसक्यामुळे अर्थमंत्र्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला की काय, अशी चर्चा आहे.

ठळक मुद्देसोमवारी होणार बैठक : अर्थमंत्र्यांचा शनिवारचा दौरा रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाºया नियोजन विभागाच्या बैठकीला ब्रेक लागला आहे. आता ही बैठक सोमवारी होणार असून, हल्लाबोलच्या धसक्यामुळे अर्थमंत्र्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला की काय, अशी चर्चा आहे.सोमवारी दुपारी १२ वा. औरंगाबाद, १ वा. जालना, १.३० वा. बीड, २.१५ वा. परभणी, ४ वा. उस्मानाबाद, ४.४५ वा. लातूर जिल्हा, ५.३० वा. हिंगोली जिल्हा, ६ वा. नांदेड जिल्ह्यातील नियोजनाचा ते आढावा घेतील. सायंकाळी ७ वा. मराठवाडा विकास मंडळाच्या सदस्यांशी ते चर्चा करतील.११०० बंधारे दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतील निधीतून तरतूद व्हावी. २० हजार एकर क्षेत्रावर तुतीच्या लागवडीसाठी जिल्हानिहाय ५ ते १० कोटींचे अनुदान मिळावे. याबाबत अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. पर्यटन विकास, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना प्रशिक्षणासाठी तरतूद? याबाबतच्या प्रस्तावावर अर्थमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.ज्या कामांसाठी तरतूद आहे, तो निधी मिळालाच पाहिजे. शिवाय ज्या कामासाठी निधी देता येत नाही, त्याला नविनीकरण योजनेत सामावून निधी द्यावा. तुतीच्या लागवडीसाठी १० हजार एकर क्षेत्र मनरेगातून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. २० हजार एकर क्षेत्र तुती लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय ५ ते १० कोटींचे अनुदान मिळावे. यासाठी प्रशासन बैठकीत पुढाकार घेणे अपेक्षित आहे.राष्ट्रवादीचा आज हल्लाबोल मोर्चासरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल यात्रा सुरू केली. या यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात नुकताच संपन्न झाल्यानंतर यात्रेचा समारोप पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.३) होत आहे. सकाळी ११ वाजता क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर सभा घेऊन दुसºया टप्प्याची सांगता होईल.या मोर्चासाठी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रियाताई सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.