शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

एटीएसने पकडलेल्या संशयितांची हर्सूल कारागृहात रवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 19:29 IST

न्यायालयाने सर्व संशयिताना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली

औरंगाबाद : इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचाराने प्रेरित होऊन रासायनिक हल्ला अथवा धार्मिक कार्यक्रमाच्या अन्नात विष कालवून मोठी मनुष्यहानी करण्याची तयारी करीत असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडलेल्या नऊ संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (दि.१८) त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावून त्यांची रवानगी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात केली. 

मोहसीन सिराजउद्दीन खान (३२, रा. मुंब्रा, ह. मु. अहबाब कॉलनी, औरंगाबाद), मजहर अब्दुल रशीद शेख (२१, रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), मोहम्मद तकी ऊर्फ  अबू खालीद सिराजउद्दीन खान (२०, रा. मुंब्रा, ह. मु. राहत कॉलनी, औरंगाबाद), मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम (२३, रा. कैसर कॉलनी), मोहम्मद सर्फ राज ऊर्फ  अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२५, रा. राहत कॉलनी, औरंगाबाद), जमान नवाब खुटेपाड (३२, रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), सलमान सिराजउद्दीन खान (२८, रा. अलमास कॉलनी), तलाह ऊर्फ अबू बकार हनिफ पोतरिक (२४, रा. एमरॉल्ड टॉवर, दोस्ती प्लॅनेट, उत्तर मुंब्रा, ठाणे) आणि फहाद सिराजउद्दीन खान (२८, रा. अलमास कॉलनी) अशी नावे संशयितांची आहेत. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २३ जानेवारी रोजी ९ संशयिताना आणि २६ जानेवारी रोजी आणखी एकाला औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक केली होती.  उम्मत-ए- मोहम्मदिया या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या संशयितांची एटीएसने तब्बल २७ दिवस कसून चौकशी केली. 

आरोपी हे आयएसआयएस (इसिस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन मुख्य संशयित मोहसीन खान याने उम्मत-ए- मोहम्मदिया या नावाने एक ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये त्याने औरंगाबाद, ठाणे आणि मुंबईत निवडक लोकांच्या (कोअर कमिटी) बैठका घेऊन  मोठी जीवित हानी करण्याचा कट रचल्याची माहिती तपासात समोर  आल्याचे एटीएसने न्यायालयास  दिली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कडक बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर केले. उभयपक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व संशयिताना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावून त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसArrestअटकCourtन्यायालय