शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

आत्महत्येची धमकी देत पंधरावर्षीय मुलीवर परिचितानेच केले अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:41 IST

माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत २५ वर्षीय विवाहित नराधमाने पंधरावर्षीय शाळकरी मुलीवर सहा महिने अत्याचार केल्याचे समोर आले. छावणी परिसरात घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या आईलाही आरोपी व त्याच्या नातलगांनी मारहाण करीत आरोपीला साथ दिली. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देछावणी पोलिसांनी ठोकल्या नराधमाला बेड्या: सहा महिन्यांपासून करीत होता अत्याचार, आरोपीच्या नातेवाईक महिलांनी दिली आरोपीला साथ

औरंगाबाद : माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत २५ वर्षीय विवाहित नराधमाने पंधरावर्षीय शाळकरी मुलीवर सहा महिने अत्याचार केल्याचे समोर आले. छावणी परिसरात घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या आईलाही आरोपी व त्याच्या नातलगांनी मारहाण करीत आरोपीला साथ दिली. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.सागर श्रीसुंदर (२५, रा. छावणी परिसर), असे आरोपी नराधमाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, छावणी परिसरातील रहिवासी पंधरावर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकत आहे. तिच्या वसाहतीत सागर राहतो. तो विवाहित असून, त्याला एक मुलगी आहे. शाळेत येता-जाता आरोपी तिचा रस्ता अडवून तू खूप सुंदर आहेस, माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन आणि तुझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकीन, अशी धमकी देत असे. सहा महिन्यांपूर्वी त्याने तिला अडविले आणि स्वत:च्या वाहनावरून विविध ठिकाणी फिरवले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केले. ही बाब आरोपीच्या नातेवाईकांना माहीत होती. असे असूनही त्यांनी त्याला पाठीशी घातले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे पीडितेचे अभ्यासात लक्ष लागेना. शिवाय ती सतत घाबरल्यासारखी राहत असे. हे तिच्या आईच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने रडतच तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पीडितेला सोबत घेऊन छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसह आरोपींविरोधात बलात्कार करणे, मारहाण करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरवसे यांनी आरोपीला अटक केली.पीडितेच्या मातेलाच केली मारहाणआपल्या मुलीवर नराधम सागरने अत्याचार केल्याचे कळताच संतप्त झालेल्या मातेने थेट आरोपीचे घर गाठून त्याच्याकडे जाब विचारला. तेव्हा आरोपीसह त्याचे नातेवाईक आशू आवळे आणि पाच महिलांनी मायलेकींना दूषणे देत शिवीगाळ करून मारहाण केली.

टॅग्स :Policeपोलिस