शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ८वर्षीय बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:52 IST

आजोबाला भेटण्यासाठी आलेली ८ वर्षीय बालिका घरात झोपलेली असताना एका २२ वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगरात रविवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी पसार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आजोबाला भेटण्यासाठी आलेली ८ वर्षीय बालिका घरात झोपलेली असताना एका २२ वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगरात रविवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी पसार आहे.गुड्डू प्रताप रिडलॉन (२२, रा. छोटा मुरलीधरनगर), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही लासूर येथील रहिवासी आहे. तिचे माहेर छोटा मुरलीधरनगरात आहे. रविवारी रात्री ८ वर्षीय पीडिता तिची आई आणि बहिणीसह आजोबाला भेटण्यासाठी छोटा मुरलीधरनगरात आली. त्यांनी आजोबाच्या घरी जेवण केले. पीडितेचे आजोबा शेजारी राहणाऱ्या तिच्या चुलत आजोबाच्या घरी झोपण्यासाठी गेले. त्यानंतर पीडिता, तिची बहीण आणि आई झोपले. रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास पीडितेची आई शौचासाठी शेजारी राहणाºया चुलत्याच्या घरी गेली. त्यांनी मुली झोपलेल्या घराचे दार लोटून घेतले. त्याचवेळी आरोपी गुड्डूने संधी साधली आणि घरात घुसून आठवर्षीय बालिकेवर अत्याचार केला. ती रडू लागली. तेव्हा त्याने तिला धमकावले. त्याचवेळी पीडितेची आई घरी परतली. तिला आरोपी ‘त्या’ अवस्थेत तेथे दिसला. त्यांनी आरोपीला शिव्यांची लाखोळी वाहत त्याच्या कानशिलात लगावली. त्याला त्या पकडत असताना आरोपी त्यांच्या हाताला झटका देऊन तेथून पसार झाला. मुलीने रडतच झालेल्या प्रकाराची माहिती आईला सांगितली. पीडितेच्या मातेने लगेच उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध बलात्काराची फिर्याद नोंदविली.