शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

छत्रपती संभाजीनगराच्या प्रवेशद्वारात १०८ फूट उंच ध्वजस्तंभावर फडकला भव्य राष्ट्रध्वज

By प्रभुदास पाटोळे | Updated: August 25, 2023 19:54 IST

‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’चा शहराच्या वैभवात भर घालणारा उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या प्रवेशद्वारात नगर नाका येथील विजय स्मारकालगत ‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’द्वारे उभारण्यात आलेल्या १०८ फूट उंच ध्वजस्तंभाचे उद्घाटन वीरपत्नी कमल भगवान खरात आणि आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन (आवा) च्या अध्यक्ष अनिता सुनील नारायणन यांच्या हस्ते ३६ फूट लांब आणि २४ फूट रुंद ध्वज फडकावून झाले. ध्वजस्तंभाचा पाया छत्रपती संभाजीनगर फर्स्टने बांधून दिला आहे.

तत्पूर्वी कोनशिलेचे अनावरण फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल अश्विन कोहली आणि स्टेशन कमांडर ब्रिगेडियर सुनील नारायणन यांच्या हस्ते झाले. ‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’द्वारे उभारण्यात आलेला देशातील हा ११५ वा ध्वजस्तंभ असल्याचे कोहली यांनी सांगितले. बुधवारी आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन डे (आवा) असल्यामुळे उद्घाटनासाठी हा दिवस निवडल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाला छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, हेमंत कोल्हे, मानसिंग पवार आदी प्रतिष्ठित नागरिक, वीर पत्नी, वीर माता, भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एम.जी. बिल्लेवार, सचिव शेषराव आराक, कोषाध्यक्ष (पीएसआय) भाऊलाल नागरे, उपाध्यक्ष सुदाम सोळंके, प्रवीण जाधव, श्रीमंत जाधव, जावळे, मगरे, सुभेदार गोगटे, कॅप्टन सोनोने, सुभेदार कदम, हवालदार भास्कर आराक आदींची उपस्थिती होती.

वर्षभर राष्ट्रध्वज फडकवण्याचे सुधारित नियमदेशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ५७ वर्षांपर्यंत वर्षभर राष्ट्रध्वज फडकवण्याची नागरिकांना मुभा नव्हती. फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक खासदार नवीन जिंदाल यांनी यासाठी लढा दिला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक भारतीयाला वर्षभर तिरंगा राष्ट्रध्वज फडकावण्याचा अधिकार दिला. दिवसा आणि रात्रीसुद्धा राष्ट्रध्वज फडकावता येतो. मात्र, सार्वजनिक ठिकाणी ध्वजावर प्रकाश (लाइट)असावा. झेंडा खादी अथवा पॉलिएस्टरचा चालतो. झेंडा मळका, फाटका नसावा. जुना झेंडा एकांतात, आदरपूर्वक, सन्मानाने पूर्णपणे नष्ट करावा लागतो. कोणतीही व्यक्ती कंबरेच्या वर वस्त्रांवर झेंडा लावू शकते. राष्ट्रध्वज उभा (व्हर्टिकल) अथवा क्षितिज समांतर (हॉरिझॉन्टल) लावता येतो, मात्र त्याचा जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये, असे सुधारित नियम असल्याचे कोहली यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिन