शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासक ! फ्रान्सची कंपनी औरंगाबादेत गुंतवणुकीस उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 16:44 IST

जैव-ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक कंपनीस मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पायाभूत सुविधांची माहिती दिली

ठळक मुद्देकंपनीने औरंगाबाद शहरातील सोयीसुविधांचा आढावा घेतला.

औरंगाबाद : जगातील चार मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या टोटल एनर्जीज् कंपनीने औरंगाबादेत गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. शहरात जैव-ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने बुधवारी दिली.

कंपनीने औरंगाबाद शहरातील सोयीसुविधांचा आढावा घेतला. महापालिका प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी टीमशी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन संवाद साधला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार टोटल एनर्जींज् यांनी इन्व्हेस्ट इंडियाच्या माध्यमातून औरंगाबाद स्मार्ट सिटीशी संपर्क साधला होता. त्यानुसार या ऑनलाइन बैठकीत पालिका प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, टोटल एनर्जीज्चे ज्यूल डिऔर, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे प्रताप मोंगा आणि इन्व्हेस्ट इंडियाचे वेदांत राज सहभागी झाले होते.

याप्रसंगी पालिका आयुक्त पाण्डेय म्हणाले की, औरंगाबाद व मराठवाडा भाग सातत्याने दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती करणारे लोक मोठ्या प्रमाणात पशुधनावर अवलंबून आहेत. कडक उन्हाळ्यात मराठवाड्यात वेगवेगळ्या भागात जनावरांसाठी चारा छावण्या उभाण्यात येतात. ज्या जैव ऊर्जा उत्पादनासाठी बायोमासचा चांगला स्रोत ठरू शकतील. जैव ऊर्जा ही वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. कारण जैव ऊर्जा उत्पादनासाठी शेतातील अवशेष कच्चा माल म्हणून वापरता येतील, असे तिवारी म्हणाले. महापालिका प्रशासन आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीने सादर केलेल्या सादरीकरणामुळे एकूण गुंतवणूकीसाठी सकारात्मक संकेत देण्यात आले. औरंगाबाद शहरात मागील काही वर्षांमध्ये तयार झालेल्या पायाभूत सविधा, औद्योगिक कंपन्यांसाठी असलेले पोषक वातावरण आदींची माहिती देण्यात आली.

औरंगाबाद- फ्रान्स संबंधाचा इतिहाससादरीकरणादरम्यान औरंगाबाद स्मार्ट सिटीने इंडो-फ्रेंच संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला. १६५३ साली फ्रेंच प्रवासी आणि हिरे व्यापारी ट्रॅव्हिएनर औरंगाबादला आले होते. त्यांनी बीबी का मकबराच्या बांधकामासाठीची वाहतूक जवळून बघितली होती. औरंगाबादची श्रीमंती आणि वैश्‍विक संस्कृती पाहून ते चकित झाले होते. भारत आणि फ्रान्सची विविध क्षेत्रातील भागीदारी, ऊर्जा संबंध आणि सांस्कृतिक संबंध यासह अन्य विषयांवर या संवाद कार्यक्रमात चर्चा झाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी