बीड : येथील शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश देवीसिंग गायकवाड यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. ते बुधवारी पोलीस खात्यातून कार्यमुक्त झाले.जालना जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील प्रकाश गायकवाड हे ९ वर्षांपूर्वी पोलीस खात्यात फौजदार या पदावर कार्यरत झाले होते. या खात्यात काम करताना त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे काम सुरू ठेवले. पोलिसांची ड्युटी अत्यंत धावपळीची असते. मात्र, अशा परिस्थितीतही गायकवाड यांनी अभ्यासासाठी वेळ काढला. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्यांनी यश मिळवले. त्यांची नायब तहसीलदार गट ब या पदासाठी निवड झाली. नागपूर येथे त्यांचे दोन महिने प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर त्यांना नियुक्ती मिळणार आहे. अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी यांनी स्वागत केले.(प्रतिनिधी)
सहायक पोलिस निरीक्षक बनले नायब तहसीलदार
By admin | Updated: May 1, 2015 00:51 IST