शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मालमत्ताधारक उच्च न्यायालयामध्ये

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

बीड : नगर परिषदेने विकास आराखड्यांतर्गत शहरातील बलभीम चौक ते नदीपात्रापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे

बीड : नगर परिषदेने विकास आराखड्यांतर्गत शहरातील बलभीम चौक ते नदीपात्रापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. विकास कामास आमचा विरोध नाही परंतु नियमानुसार भूसंपादन करून आमच्या मालमत्तेची किंमत बाजारभावानुसार मिळावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका मंगळवारी दाखल केली आहे.मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. नगर परिषदेने १८ फेब्रुवारी २०१४ रोजी एका दैनिकाच्या माध्यमातून जाहीर प्रगटन दिले आहे. बलभीम चौक ते बिंदूसरा नदीपात्रातपर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, मालमत्ताधारकांनी आपले बांधकाम काढून घ्यावे, असा उल्लेख त्यात केला आहे. या भागामध्ये दुकाने, घरे व धार्मिक स्थळांचा समावेश आहे. रस्ता विकास योजनेंतर्गत बाजार परिसर ते लोणारपुरा चौक, बलभीम चौक ते बिंदूसरा नदी आणि जुना कत्तलखाना तसेच मोमीनपुरा ते बार्शी नाका भागातील मालमत्तेला बाधा होणार असल्याचे जाहीर प्रगटनात सांगितले आहे. तसेच १५ दिवसांच्या आत हे बांधकाम काढून घेतले नाही तर त्यांचे बांधकाम पोलिसांच्या मदतीने काढण्यात येईल, असे नगर परिषदेने सांगितले होते.त्यामुळे याचिकाकर्त्यांनी नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना विनंती करून प्रक्रियेनुसार मालमत्तेचे अधिग्रहण करावे व त्यानुसार मावेजा मिळावा, अशी मागणी केली होती. आमचा या रस्ता रुंदीकरणाच्या कामास विरोध नाही, परंतु आमच्या मालमत्तेचे अधिग्रहण कायद्यानुसार होऊन, बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ठरवावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. दरम्यान, २ फेब्रुवारी व त्यापूर्वी ३१ जानेवारी रोजी माजी नगरसेवक पठाण जलील खान रजाक खान व माजी आमदार आदिनाथ नवले यांनी नगर परिषदेकडे त्यांनी हीच मागणी केली होती. मालमत्तेचे अधिग्रहण हे योग्य पद्धतीने करा व त्यांना पैसे द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. समशोद्दीन अन्वरोद्दीन खुर्शीद हुसेन, कलीमोद्दीन ख्वाजा मोहियोद्दीन, सय्यद अब्दुल बारी, माणिकराव किसन गायकवाड, मोहम्मद मुन्वर मोहम्मद गौस, सय्यद लाला दुरोद्दिन सय्यद समशोद्दिन यांच्यासह एकूण ३५ मालमत्ताधारकांच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.नगर परिषदेने भूसंपादन कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नगर परिषदेचे कर्मचारी तेथे आले व त्यांनी जागा मोजणी केली आहे की नाही याची पाहणी केली. कायद्यानुसार हे चुकीचे आहे. नगर परिषदेने मेजरमेंट रिपोर्ट दिला नाही आणि मालमत्ताधारकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे मालमत्ताधारक म्हणाले. (प्रतिनिधी)नगर परिषदेच्या वतीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुन्या बीड शहरातील रस्त्यांचे रूंदीकरण तीन टप्प्यात करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. राजुरी वेस ते बलभीम चौक टप्पा क्रमांक एक, बलभीम चौक ते माळीवेस टप्पा क्रमांक दोन या रस्त्याचे रूंदीकरण बाधित मिळकतधारकांच्या सहकार्यामुळे पूर्ण झालेले आहे. धुळे-सोलापूर महामार्ग बिंदूसरा नदीच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या भागातून शहराला जोडण्यात येणार आहे. बलभीम चौक ते कोतवाली वेस (जूना पूल) रस्त्याचे रूंदीकरण होणे आवश्यक आहे. या कामासाठी २५ जण बाधित मिळकतीचा ताबा नगर परिषदेला देण्यासाठी संमती दिली आहे. त्या बदल्यात त्यांना टीडीआर प्रमाणपत्र दिले आहे. रस्ता रूंदीकरणाचा ठराव सर्वानुमते पारित झाला असून, भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.