शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांचे आता एकच ‘मिशन उमेदवारी’; तिकीटासाठी वेगवेगळ्या पक्षात लावून ठेवली 'फिल्डिंग'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:12 IST

आपल्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षांचे पर्यायही चाचपून पाहिले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. २३ डिसेंबरपासून सुरू हाेणार आहे. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी आतापासूनच उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. आपल्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षांचे पर्यायही चाचपून पाहिले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत लढायचे, आता मागे हटायचे नाही, अशी भूमिका इच्छुकांनी घेतली आहे.

महापालिकेची मागील निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. २०२० मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होती, पण झाली नाही. आता २०२६ मध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. एका प्रभागात कुठे १५ ते कुठे ३० पेक्षा अधिक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. एका प्रभागातून चौघांनाच उमेदवारी मिळेल. त्यातही महायुती, महाविकास आघाडी झाली तर इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आणखी कमी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पक्षातील काही ज्येष्ठांची मनधरणी सुरू केलेली आहे. तिकीट हमखास आपल्यालाच मिळणार, असा अनेकांना आत्मविश्वास वाटत असल्याने ते मीच उमेदवार अशी भविष्यवाणीही करीत आहेत. सर्वाधिक इच्छुकांची रांग भाजपाकडे आहे. त्या पाठोपाठ शिंदेसेना, एमआयएम, उद्धवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचितकडेही मोठ्या प्रमाणात उमेदवारीची मागणी केली जात आहे.

माजी नगरसेवक निवांतसर्वच राजकीय पक्षांमधील माजी नगरसेवक तिकीट आपल्यालाच मिळेल या अर्विभावात दिसत आहेत. त्यातील काही जणांचा पत्ता यंदा कट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मागील वेळी हे नगरसेवक वॉर्डातून निवडून आले होते. आता त्यांना प्रभागातून लढायचे आहे. त्यामुळे ते विजयाची शक्यता काहीसी धूसर झाली आहे. त्यात सर्व पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांसाठी इलेक्टिव्ह मेरिट हा निकष लावला असून तशा सशक्त उमेदवारांचा शोध सुरू आहे.

आर्थिक स्थितीची चाचपणीप्रभागाचे आकारमान व मतदार संख्या पाहता उमेदवारांना मोठ्या प्रमाणात ‘रसद’ लागणार आहे. उमेदवार मतदारांवर किती ‘माया’ उधळू शकतो याचाही अंदाज नेते घेत आहेत. एकजीवाचे व समतूल्य चार उमेदवार एकत्र असेल तरच निवडणूक काहीशी सोपी होईल. कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार प्रतिस्पर्धी असू शकतात, याचीही माहिती उमदेवारांकडून घेतली जात आहे. मंगळवारी एका पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये या सर्व बाबींचा उहापोह होत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Aspirants' single mission: Candidacy; fielding in different parties for tickets!

Web Summary : With municipal elections announced after a long wait, aspirants are actively seeking candidacy, exploring options across parties. Competition is fierce, with numerous hopefuls vying for limited spots. Financial strength and electability are key considerations for parties seeking strong contenders.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६