शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन व वारसा स्थळे उघडण्याचा एएसआयचे आदेश, मात्र अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 19:16 IST

पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक वास्तू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.

ठळक मुद्देभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचा उघडण्याचा आदेश  विभागीय कार्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार

औरंगाबाद : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) अंतर्गत असलेली ऐतिहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालये १६ जूनपासून उघडण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एएसआयच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच संबंधित पर्यटन स्थळे उघडण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद मंडळाचे पुरातत्त्व अधीक्षक डाॅ. मिलनकुमार चावले यांनी दिली.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अंतर्गत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात असलेली जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर या ऐतिहासिक वास्तू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. एएसआयच्या वास्तू विभागाचे संचालक एन. के. पाठक यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, १६ जूनपासून एएसआयच्या अंतर्गत असलेली सर्व स्मारके, पुरातन स्थळे सुरू करण्यात यावीत, ही स्मारके, पुरातन स्थळे सुरू करताना संबंधित राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे. यानुसार एएसआयच्या औरंगाबाद मंडळाचे पुरातत्त्व अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ११ जून रोजी पत्र पाठविले आहे. या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत ऐतिहासिक वास्तू उघडण्याविषयी निर्णय घेण्यासाठी चर्चा केल्याची माहिती संबंधितांनी दिली.

एएसआयचे पत्र मिळालेभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पर्यटन स्थळे उघडण्याविषयीचे पत्र मिळाले आहे. त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.- सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यकआमच्या विभागाच्या अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच उघडण्यात येतील. ताेपर्यंत आम्हांला काेणताही निर्णय घेता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.- डाॅ. मिलन कुमार चावले, पुरातत्त्व अधीक्षक, औरंगाबाद मंडळ एएसआय

आम्हाला कोणत्याही सूचना नाहीतराज्य पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहण्यासाठी उघडण्याचा निर्णय हा राज्यस्तरावरून घेतला जातो. अद्यापर्यंत आम्हांला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त झाल्यास त्याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.- अजित खंदारे,सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावाऔरंगाबादेतील पर्यटन स्थळे उघडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. एएसआयने पर्यटनस्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतल्यास पर्यटनस्थळे उघडतील. पर्यटनस्थळे उघडल्यानंतर अनेकांचा गेलेला रोजगार पुन्हा परत मिळणार आहे. पर्यटनस्थळे उघडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाल्यामुळे आता विमान आणि रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.- सुनित कोठारी, उद्योजक तथा अध्यक्ष, एटीडीएफ 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन