शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून फौजदाराचे पाडले दात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:07 IST

रस्त्यात उभी असलेली कार बाजूला घेण्यास सांगणा-या वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाणीत उपनिरीक्षकाचे तीन दात पडून त्यांना जबर दुखापत झाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रस्त्यात उभी असलेली कार बाजूला घेण्यास सांगणा-या वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाणीत उपनिरीक्षकाचे तीन दात पडून त्यांना जबर दुखापत झाली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप भगवान पाटोळे (५४, रा. रामनगर पोलीस कॉलनी) यांची शुक्रवारी साप्ताहिक सुटी होती. दुपारी दीडच्या सुमारास ते बाजारातून भाजीपाला घेऊन दुचाकीवर घरी जात असताना पाटोळे यांना जैन शाळेच्या मागील बाजूस रस्त्यावर एक ओमनी कार (क्र.एमएच २०, १९५२) उभी असल्याची दिसली. इतर वाहनांना अडथळा होत असल्याने त्यांनी खाली उतरून चालकास कार बाजूला घेण्यास सांगितले.कारमधील सतीश ताराचंद यादव व संतोष ताराचंद यादव (रा.रामनगर, बालाजी मंदिर) यांनी दिलीप पाटोळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्य पाच ते सहा जणांनी धावत येऊन पाटोळे यांना काठ्यांनी मारहाण केली. ‘तेरा काम तमाम कर देंगे’ असे म्हणत खिशातील अठराशे रुपये काढून घेऊन ते पळून गेले. मारहाणीत पाटोळे यांचे तीन दात पडले. डोक्याला गंभीर इजा झाली. चेहºयाचे हाड फ्रॅक्चर झाले. मारहाण करणारे ओमनी कारमधून पळून गेले.या प्रकरणी पाटोळे यांनी शुक्रवारी रात्री सतीश ताराचंद यादव, संतोष ताराचंद यादव यांच्यासह चार महिला व अन्य पाच ते सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश यादव यास पोलिसांनी शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यास १८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक काकडे तपास करीत आहेत.