शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आष्टी, माजलगावात रास्ता रोको

By admin | Updated: May 21, 2017 23:51 IST

आष्टी/ माजलगाव : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडके या माथेफिरु विरूद्ध जिल्हाभरातून संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी/ माजलगाव : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडके या माथेफिरु विरूद्ध जिल्हाभरातून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, गावागावात बंदचे फलक झळकू लागले आहेत. तत्पूर्वी रविवारीच पांढरी (ता.आष्टी) व माजलगाव येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.विठ्ठल तिडके याने एका व्यक्तीशी भ्रमणध्वनीवरुन साधलेल्या संवादात महापुरुषांबद्दल अर्वाच्च शब्दप्रयोग केले. ही आक्षेपार्ह ‘व्हाईस क्लिप’ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिडकेला कठोर शासन करावे यास मागणीसाठी रविवारी आष्टी तालुक्यातील पांढरी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी बीड - अहमदनगर राज्य मार्गावर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. संपूर्ण गाव आंदोलनात उतरले होते.निषेध म्हणून आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती हातावर बांधल्या होत्या. तब्बल दोन तास राज्यमार्ग ठप्प झाला होता. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान, दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे शिवाजी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. आठवडी बाजारचा दिवस असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनबीड : महापुरूषांबद्दल विठ्ठल तिडके नामक माथेफिरूने अपशब्द वापरून अश्लिल भाषेत केलेल्या संवादामुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. या माथेफिरुवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा बंदची हाक दिली आहे. बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विविध पक्ष- संघटनांतर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव, नितीन बावणे, शरद चव्हाण, राहुल वाईकर, बापूसाहेब शिंदे, धनंजय शेंडगे, पंजाबराव येडे, शिवाजी शिंदे, जनार्दन शिंदे, संतोष डोंगरे, सुसेन नाईकवाडे, रवींद्र हावळे, प्रदीप बहार, मधुकर शेळके, दयानंद गायकवाड, गोपाळ धांडे, विलास शिंदे, विकास होके, पवन कुडके, प्रवीण तेलप, विनोद चव्हाण, निशांत घुमरे, अमोल बागलाने, नितीन बागलाने, अजित मुळूक, दादा उगले आदींनी दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जि.प. सदस्य अ‍ॅड. प्रकाश कवठेकर, मराठा क्लबचे अशोक सुखवसे यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला असून बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. जय भगवान महासंघाचे जिल्हाप्रमुख बप्पासाहेब घुगे यांनीही बंदला पाठिंबा दर्शविला आहे. ट्रकमालक- चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय काकडे यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.पोलिसांतर्फे शांततेचे आवाहनमहापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल रामकिसन तिडके (रा. कुंडी ता. जळकोट, जि. लातूर) यास पोलिसांनी रविवारी दुपारी जेरबंद केले. नागरिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.