छत्रपती संभाजीनगर: ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीनगरमधील गजानन महाराज मंदिर भक्त परिवार आणि शहरवासीयांच्या मनात त्यांच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला आहे. गारखेडा परिसरातील सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज मंदिराच्या उभारणीसाठी आशाताईंनी दिलेली 'स्वरसेवा' आजही भक्तांच्या स्मरणात आहे. १९८७ मध्ये झालेल्या एका भव्य सांगीतिक सोहळ्यातून मिळालेले उत्पन्न मंदिर उभारणीसाठी अत्यंत मोलाचे ठरले होते.
'यशवंत स्टेडियम'वर रंगली होती ऐतिहासिक संगीत रजनीऐंशीच्या दशकात जेव्हा मंदिराचे काम सुरू होते, तेव्हा अनेक दिग्गजांनी आपली कला श्रींच्या चरणी अर्पण केली होती. यातील सर्वात भव्य आणि अविस्मरणीय कार्यक्रम म्हणजे 'किशोर-आशा-आर.डी. संगीत रजनी'. दि. २ जानेवारी १९८७ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या 'यशवंत स्टेडियम'वर हा सोहळा पार पडला. किशोरकुमार, आशा भोसले आणि राहुल देव बर्मन या महान त्रयीने आपल्या सुरांनी संभाजीनगरकरांना भारावून टाकले होते. या कार्यक्रमातून मिळालेल्या योगदानाचा मोठा वाटा मंदिर उभारणीत वापरण्यात आला.
भक्त परिवाराकडून श्रद्धांजलीश्री गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वक्ते यांनी या आठवणींना उजाळा देत सांगितले की, "त्यावेळचा तो सोहळा आजही डोळ्यासमोर उभा राहतो. आशाताईंचे योगदान केवळ सांगीतिक नव्हते तर ते आध्यात्मिक आणि निःस्वार्थ होते." या निःस्वार्थ योगदानाबद्दल विश्वस्त मंडळ, भक्त परिवार आणि शहरवासीयांच्या वतीने आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
Web Summary : Asha Bhosle's 'swarseva' (musical offering) for Chhatrapati Sambhajinagar's Gajanan Maharaj temple construction is fondly remembered. Her 1987 concert, featuring Kishore Kumar and R.D. Burman, significantly funded the temple's creation. The community deeply appreciates her selfless contribution and pays heartfelt tribute.
Web Summary : आशा भोसले की 'स्वरसेवा' (संगीत अर्पण) छत्रपति संभाजीनगर के गजानन महाराज मंदिर निर्माण के लिए स्नेहपूर्वक याद की जाती है। किशोर कुमार और आर.डी. बर्मन की विशेषता वाला उनका 1987 का संगीत कार्यक्रम मंदिर के निर्माण के लिए महत्वपूर्ण रूप से वित्त पोषित था। समुदाय उनके निस्वार्थ योगदान की गहराई से सराहना करता है और हार्दिक श्रद्धांजलि अर्पित करता है।