शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

राज्यस्तरीय बँड स्पर्धेत आर्यचाणक्य धाम संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:03 AM

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय बँड स्पर्धेत औरंगाबादच्या आर्य चाणक्य विद्याधाम संघाने विजेतेपद पटकावले. विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या या स्पर्धेत भंडारा येथील सन फ्लॅग संघ अजिंक्य ठरला.

औरंगाबाद : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय बँड स्पर्धेत औरंगाबादच्या आर्य चाणक्य विद्याधाम संघाने विजेतेपद पटकावले. विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या या स्पर्धेत भंडारा येथील सन फ्लॅग संघ अजिंक्य ठरला.या स्पर्धेत मुलांच्या गटात चंद्रपूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, जळगाव, धुळे, अकोला या संघांनी सहभाग घेतला. मुलींच्या गटात अहमदनगर, सोलापूर, धुळे, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, सातारा व यजमान औरंगाबादच्या संघाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उपसंचालक क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. बक्षीस वितरण क्रीडा भारतीचे भिकन बारसे, उदय कहाळेकर, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, ऊर्मिला मोराळे, प्रशांत नवगिरे यांच्या उपस्थितीत झाले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, गुरुदीपसिंग संधू, कृष्णा केंद्रे, भाऊराव वीर, चंद्रशेखर घुगे, सदानंद सवळे, सचिन बोर्डे, गणेश बेटुदे आदींनी परिश्रम घेतले.