राजेंद्र सुनील कपीले (३०, रा. सिडको एन ७ ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार बसचालक सुनील ज्ञानदेव मोरे हे एस टी महामंडळाच्या अकोला आगाराची अकोला- पुणे ही शिवशाही बस सोमवारी रात्री सिडको बसस्थानक येथून मध्यवर्ती स्थानक येथे घेऊन जात होते. हायकोर्ट वाहतूक सिग्नलजवळ मागून आलेल्या मोपेडस्वार अनोळखी तरुणाने अचानक बसचालक मोरे यांना शिवीगाळ करीत बस अडवली. बस नीट चालविता येत नाही का असे म्हणून त्याने मोरे यांना धमकी दिली आणि बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. या प्रकारानंतर बसचालक सुनील यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून मोपेडच्या क्रमांकावरुन राजेंद्र कपीले याला शोधून काढले. त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि बसचालकाने त्याला ओळखले. घटनेनंतर अवघ्या २ तासांत आरोपीला अटक करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे तपास करीत आहेत.
एसटी बसवर दगडफेक करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST