शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

महिलांवर सामूहिक अत्याचार प्रकरणी एका संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 10:55 IST

रात्रभर कोंबिंग ऑपरेशन : संदीपान भुमरे यांनी घेतली पीडितांची भेट

औरंगाबाद : राज्याला हादरवून सोडणाऱ्या पैठण तालुक्यातील तोंडोळीच्या शेतवस्तीवरील महिलांवर सामूहिक अत्याचार आणि दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी गुुरुवारी रात्री उशिरा एका संशयिताला अटक केली. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या आठ साथीदारांचा शोध घेण्यासाठी सहा पथके रवाना करण्यात आली आहेत.गुरुवारी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन करून मदतीचे आश्वासन दिले. तोंडोळी भागातील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून एक परप्रांतीय कुटुंब राहण्यास आले होते. मंगळवारी रात्री सात ते आठ दरोडेखोरांनी या कुटुंबावर हल्ला करून दोन महिलांवर चाैघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती.घटनेच्या दुसऱ्या दिवशीही पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल, स्थानिक गुन्हे शाखेेचे संतोष खेतमाळस यांनी बिडकीन परिसरात ठाण मांडले होते. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केले.सर्वतोपरी मदत करणार : भुमरेपीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, पीडित कुटुंबाला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सर्वतोपरी मदत करणार आहे. या घटनेतील आरोपींना लवकरच पोलीसही अटक करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राज्यात मोगलाई : वाघराज्यात महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. सरकारचे अस्तित्व राहिले नसून, मोगलाई अवतरली असल्याची टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.शुक्रवारी सकाळपर्यंत गुन्ह्याची पूर्णपणे उकल होईल, असा विश्वास आहे. औरंगाबाद पोलीस ग्रामीण दलातील प्रत्येकजण आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.- पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण