शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षीय बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:08 IST

खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून सात वर्षीय बालिकेवर तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास शिवशंकर कॉलनीत घडली.

औरंगाबाद : खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून सात वर्षीय बालिकेवर तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास शिवशंकर कॉलनीत घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली.करण टिल्लू घोडके (२०, रा. शिवशंकर कॉलनी) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, पीडित बालिका शहरातील एका नामांकित शाळेत पहिल्या वर्गात शिकते. शेजारी महिलेने मंगळवारी सायंकाळी पूजेनिमित्त त्या बालिकेला घरी बोलावले होते. तिच्या वयाच्या अन्य तीन बालिकेसोबत तीही त्या घरी गेली होती. त्या महिलेच्या घरात आरोपी करण भाडेकरू आहे. त्या घरात सर्वच चिमुकल्या मैत्रिणी बसल्या होत्या. तेव्हा करणने त्यांना त्याच्या खोलीत बोलावले. तिच्यासोबतच्या दोन मुलींना प्रत्येकी शंभर रुपये देऊन त्यांना सुटे पैसे आणण्यासाठी त्याने बाहेर पाठवून दिले. त्यानंतर एकट्या चिमुरडीवर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरून ती रडायला लागली. बाहेर गेलेल्या मुली काही वेळातच परत आल्याने आरोपीने तिला सोडून दिले. ती त्यांच्यासोबत रडतच घरी आली. आईला पाहून तिने हंबरडाच फोडला. आईने तिला जवळ घेऊन विचारले, तेव्हा तिने घडलेला प्रसंग सांगितला. आई मुलीला घेऊन तात्काळ शेजाºयाच्या घरी गेली, तेव्हा भाडेकरू करणने हे घाणेरडे कृत्य केल्याचे त्यांना समजले. मात्र तो त्यावेळी घरी नव्हता. मुलगी प्रचंड घाबरल्याने तिच्या आई-बाबांनी रात्री पोलिसांत तक्रार केली नाही. बुधवारी सकाळीच नराधमाला पकडून चोप देऊन त्याच्याविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मीरा लाड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.