लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: बंगळुरु येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी आणि त्यामागील सूत्रधाराला त्वरित अटक करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे़महाराष्ट्रात यापूर्वी डॉ़ नरेंद्र दाभोलकर, कॉ़ गोविंद पानसरे यांचाही अशाचप्रकारे खून करण्यात आला होता़ त्यांचे मारेकरी आणि सूत्रधार अद्याप सापडले नाहीत़ पोलीस तपासात होत असलेल्या दिरंगाईमुळे गुन्हेगांरावर वचक बसण्याऐवजी त्यांची हिंमतच वाढत आहे़ ही बाब पुरोगामी विचारवंतांसाठी चिंतेची असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पत्रकार गौरी लंकेश, डॉ़ दाभोलकर, कॉ़पानसरे, प्राक़लबुर्गी या चारही पुरोगामी विचारवंतांच्या मारेकºयांना अटक करुन कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही करण्यात आली़यावेळी प्रा़ डॉ़ लक्ष्मण शिंदे, किरण चिद्रावार, बालाजी टिमकीकर, प्रा़डॉ़ डी़ आऱ मुंडे, प्रा़ ई़ एम़ खिल्लारे, प्रा़ एस़ एफ़ गोरे, प्रा़ एम़ एम़ देशमुख, सूर्यकांत वाणी, अल्ताफ हुसेन, कॉ़ के़ के़जामकर, प्रा़अरविंद जोगदंड, कॉ़ विजय गाभणे, कॉ़ प्रदीप नागापूरकर, कॉग़ंगाधर गायकवाड, कचरु रासे यांची उपस्थिती होती़
मारेकºयांना अटक करा; अंनिसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:43 IST