शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ योजनेसाठी सेना धावली

By admin | Updated: December 9, 2014 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेने जानेवारी २०१३ मध्ये सुरू केलेल्या मोफत अंत्यविधी योजनेस घरघर लागली आहे.

औरंगाबाद : महापालिकेने जानेवारी २०१३ मध्ये सुरू केलेल्या मोफत अंत्यविधी योजनेस घरघर लागली आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी आज पहिल्यांदाच शिवसेना-भाजपा युतीचे शिष्टमंडळ आयुक्त पी.एम. महाजन यांना भेटले. प्रशासन योजना बंद करण्याच्या विचारात असल्यामुळे शिष्टमंडळ सदस्य आणि आयुक्तांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे तूर्तास ती योजना बंद होण्याचे संकट टळले असून, नवीन वर्षात काही बदल होण्याचे संकेत आहेत. काही जरी झाले तरी ती योजना सुरूच ठेवावी. त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर करा; मात्र योजना बंद करू नये, असे आदेश शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. जानेवारी महिन्यापासून मोफत अंत्यसंस्कारासाठी नगरसेवकांचे पत्र स्मशान परवान्यासोबत जोडण्याची अट टाकली जाणार आहे. १९ आॅक्टोबरनंतर पहिल्यांदाच शिवसेना-भाजपाने एखाद्या सार्वजनिक योजनेप्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांतील वादामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील मैत्रीचा ‘अंत’ होण्याची वेळ आली होती; परंतु वर सर्व काही जमल्यामुळे मनपातील पदाधिकाऱ्यांनी मोफत अंत्यसंस्कार योजनेवरून का होईना युती अभेद्य असल्याचे दाखवून आयुक्तांची भेट घेतली. उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, शहरप्रमुख राजू वैद्य, सभागृह नेते किशोर नागरे, नितीन चित्ते, जगदीश सिद्ध, सुशील खेडकर यांनी आयुक्त पी.एम. महाजन यांची भेट घेऊन योजनेची थकलेली रक्कम देण्याची मागणी केली. स्मशानजोग्यांनी आज उपमहापौर संजय जोशी यांची भेट घेऊन योजनेला लागलेल्या घरघरीला वाचा फोडली. त्यानंतर युतीचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, गौऱ्यांच्या पुरवठादारांची रक्कम थकल्याचे जोशी यांनी सांगितले.तीन महिन्यांपासून स्मशानजोग्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. १७ लाख रुपयांची ती रक्कम आहे. ही योजना सुरू होऊन २३ महिने झाले आहेत. अशातच योजनेला घरघर लागल्यामुळे ती बंद पडण्याच्या वाटेवर आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती आणि दानशूरांनी आखडलेला हात यामुळे पुढच्या वर्षी योजना सुरू राहिल की नाही, हे सांगता येत नाही.३४स्मशानभूमींमध्ये २२ महिन्यांत ६ हजार ५६५ अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमहापौर जोशी म्हणाले, १६ लाख थकले आहेत. ५ लाख रुपये देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले; मात्र प्रत्येक स्मशानजोग्याच्या खात्यावर अनुदानरूपाने ती रक्कम जाते. त्यामुळे ५ लाख रुपये सर्वांच्या खात्यावर जमा करणे अशक्य आहे.१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च त्या उपक्रमावर मनपा निधीतून आजवर करण्यात आला आहे. शहरातील ३४ स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात ३ हजार ६२२ अंत्यविधी करण्यात आले. चालू वर्षात २ हजार ९५३ अंत्यविधी झाले आहेत. प्रत्येक विधीसाठी मनपा २५०० रुपयांचे अनुदान देत आहे. शहरप्रमुख राजू वैद्य म्हणाले, ती योजना बंद करू नये, अशा सूचना आयुक्तांना केल्या आहेत. प्रशासन सार्वजनिक हिताच्या योजना जर बंद करीत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. मोफत अंत्यविधीची योजना गरिबांसाठी होती; मात्र श्रीमंत किंवा ज्यांची २ हजार ५०० रुपये देण्याची ऐपत आहे ते नागरिकदेखील मनपाच्या खात्यावर धनादेश किंवा रोख रक्कम टाकत नाहीत. २२ महिन्यांत १ लाख ४७ हजार रुपये मनपाच्या ५०१००००३४२२७४७ या खात्यावर जमा झाले आहेत. ४या काळात मनपाने अंत्यसंस्कार सामग्रीवर दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. विद्युत दाहिनीचा वापर केला पाहिजे. तशीच ही योजना मनपाच्या फायद्याची नाही, त्यामुळे याप्रकरणी पुनर्विचार झाला पाहिजे, असे आयुक्तांचे मत आहे.