जालना : राज्यमंत्री मंडळात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांची वस्त्रोद्योग, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. शपथविधी सोहळ्यानंतर राज्यमंत्री खोतकर यांचे सोमवारी प्रथमच शहरात आगमन झाले. त्यांचे आगमन होताच औरंबादपासूनच ठिकठिकाणी उत्स्फूर्त व जल्लोषात स्वागत करण्यात आले. भर पावसातही स्वागत करण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. सोमवारी दुपारी एक वाजता मोतीबागेपासून राज्यमंत्री खोतकर यांची मिरवणूक निघाली. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, सहसंपर्क प्रमुख शिवाजी चौथे,, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, जगन्नाथ काकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्जुन खोतकर यांचे जोरदार स्वागत
By admin | Updated: July 12, 2016 00:51 IST