जालना : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी बाजार समिती मतदार संघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर व उत्तम पवार यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणूक होण्यापूर्वीच उत्तम पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. १७ संचालक असलेल्या या बँकेत आतापर्यंत ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. (प्रतिनधी)
अर्जुन खोतकर मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध
By admin | Updated: February 5, 2017 00:04 IST