धर्माबाद/ अर्धापूर : गुरुवारी सायंकाळी अर्धापूर, धर्माबाद परिसरात वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.पावसामुळे वातावरणात एकदम बदल झाल्याने धर्माबाद आणि अर्धापूरकर चांगलेच सुखावले. भयंकर उन्हामुळे लोक वैतागले होते. गुरुवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येण्याची चिन्हे होती. सायंकाळी पाऊस आला. दोन्ही ठिकाणी जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याचे आमच्या वार्ताहरांनी कळविले आहे.(वार्ताहर)
अर्धापूर, धर्माबादेत पाऊस
By admin | Updated: June 2, 2016 23:24 IST