अर्धापूर : पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया अर्धापूर पोलिस ठाण्याच्याा वार्षिक तपासणी निमित्ताने येवून गेले़ दरम्यान, येथील जनता, प्रतिष्ठित मंडळी व पत्रकारांशी सुसंवाद साधला नाही वा कोणता कार्यक्रमही घेण्यात आला नाही़ त्यामुळे जनतेत विशेषत: पोलिसमित्रात नाराजीची भावना निर्माण झाली़ आजपर्यंत अर्धापूरला पोलिस आणि जनता हा संबंध परस्परपूरक कसा ठरू शकतो या बाबतीत तत्कालीन अनेक पोलिस अधीक्षकांनी प्रयत्न केला़ त्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी पोलिस ठाणे अंतर्गत अनेक ठिकाणी मोहल्ला कमिटी स्थापन करून जनतेश्ी संपर्क साधला होता़ तसेच नुकतेच बदलून गेलेले पोलिस अधीक्षक व्ही़ एऩ जाधव यांनी पोलिसमित्र तयार करून जनतेशी जवळीक साधली होती़ अशा रितीने पोलिस-जनता यांच्यात जवळीक निर्माण होत असताना नूतन पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनिमित्त अर्धापूरला भेट दिली़ आजपर्यंतच्या इतिहासात पोलिस अधीक्षकांनी जेव्हा जेव्हा अर्धापूरला भेटी दिल्या, त्या-त्या वेळेस गावातील जनतेची भेट घेवून सुसंवाद साधला आणि अर्धापूर हे संवेदनशील गाव म्हणून दफ्तरी नोंद असताना पोलिस अधीक्षकांनी वार्षिक तपासणी आटोपून परस्पर नांदेड गाठले़ यावरून पोलिस अधीक्षकांच्या स्वागतासाठी आतूर असलेल्या पोलिस मित्र व जनतेत नाराजी पसरली़ नांदेडसारख्या मोठ्या जिल्ह्याचा पदभार परमजितसिंह दहीया यांनी स्वीकारला़ विशेष जबाबदारीचा पहिलाच पदभार आणि त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधीक्षकांना कदाचित वेळ मिळाला नसावा, अशी चर्चा पोलिसमित्रांत सुरु आहे. (वार्ताहर)सध्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी मनुष्याचे जीवन सुखी करण्याबरोबरच समाजामध्ये नकारात्मक, अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे़ किंबहुना या सुविधांनी गुन्हेगारालाही भरपूर वाव दिला आहे़ या गुन्हेगारीची पाळेमुळे खनून काढण्याचे आव्हान आज पोलिसांसमोर आहे़ यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देवून आपआपल्या कौशल्यबुद्धीने जनतेश्ी जवळीक साधून मग ते मोहल्ला कमिटी असो वा पोलिसमित्र असो, असे नवनवे पॅटर्न राबवून हे काम करावे लागणार आहे़ राज्याचे पोलिस महासंचालकही कम्युनिटी पोलिसिंगच्या बाबतीत पुढाकार घेत असतात़
अर्धापूरचे पोलिसमित्र हिरमुसले
By admin | Updated: June 11, 2014 00:23 IST