लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ६९० ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. सरपंच पदासाठी एकूण ४५०० पेक्षा जास्त, तर सदस्य पदासाठी एकूण २० हजारांवर नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.धारूर : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी १६१ तर सदस्य पदासाठी ७४५ अर्ज दाखल झाले.वडवणी : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १०६ तर सदस्यपदासाठी ५०४ अर्ज दाखल झाले. सदस्य पदासाठी ७०१ तर सरपंचपदासाठी १५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले.शिरूर कासार : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकूण १५७ तर सदस्यपदासाठी ८१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.केज : तालुक्यातील एकूण ६६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ३३५ तर सदस्यपदासाठी २०५८ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार अविनाश कांबळे यांनी दिली.परळी : तालुक्यात ७९ ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी एकूण २२५१ तर सरपंच पदासाठी ४५० अर्ज दाखल झाले.माजलगाव : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी २५२ तर सदस्यपदासाठी ११६९ एकूण अर्ज दाखल झाले.अंबाजोगाई : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ३६३ तर सदस्यपदासाठी १७३३ एकूण उमेदवारी अर्ज दाखल झाले.आष्टी : तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ६८९ तर सदस्यपदासाठी २५२८ एकूण उमेदवारी अर्ज दाखल झाले.बीड : तालुक्यातील १३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ७०० तर सदस्यपदासाठी एकूण ३००० उमेदवारी अर्ज दाखल झाले.गेवराई आणि पाटोदा तालुक्यातील नामनिर्देशन पत्रांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.आॅनलाईन प्रणालीमुळे इंटरनेट, सेवा केंद्रांवर झुंबड उडाली होती. सरपंच आणि सदस्य पदासाठी बहुतांश ठिकाणी तरुण उमेदवारांचा भरणा आहे.
सरपंचपदासाठी साडेचार हजार, सदस्यासाठी २० हजारांवर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:49 IST