शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'न तपासता फाईल्स मंजूर करा, अन्यथा पदभार सोडा'; औरंगाबाद जिल्हा परिषदेत अजब ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 14:07 IST

सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांचे सीईओंवर दबावतंत्र

औरंगाबाद : विविध विभागांकडून येणाऱ्या फाईल्सवर नियमांवर बोट ठेवून त्रुटी काढून त्या परत पाठविल्या जातात, यामुळे कामे मंजूर होण्यास विलंब होतो, अशी तक्रार करत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी करमाड येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे येणारी प्रत्येक फाईल तत्काळ मंजूर करा, अन्यथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार डॉ. सुनील भोकरे यांच्याकडे द्या, असा ठराव मंजूर केला.

जि. प. ची शेवटची सर्वसाधारण सभा शुक्रवारी करमाड येथे अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड आणि सीईओ गटणे यांची उपस्थिती होती. प्राप्त निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी सदस्य धडपड करत आहेत पण सीईओ प्रत्येक फायलींचे बारकाईने वाचन करतात. त्रुटींबाबत टिप्पणी लिहून त्या परत पाठवितात. आपल्या प्रत्येक फाईलवर सीईओंनी विनाअट सही करावी, यासाठी पदाधिकारी सीईओंवर दबाव टाकत आहेत. पदाधिकाऱ्यांनी सभेत सीईओंना लक्ष्य केले. सीईओंकडे असलेला अतिरिक्त सीईओंचा पदभार त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अन्यथा आमच्या फाईल्समध्ये त्रुटी न काढता मंजूर कराव्यात, अशी मागणीच बांधकाम सभापतींनी केली. एवढेच नव्हे तर अतिरिक्त सीईओंचा पदभार डॉ. सुनील भोकरे यांच्याकडे देण्यात यावा, असा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला.

चुकीचा ठराव घेतल्याची चर्चाजि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांची मुंबईला बदली झाली. काही दिवस हा पदभार पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, भोकरे महिनाभर रजेवर होते तेव्हापासून हा पदभार सीईओंनी स्वत:कडे ठेवला आहे. पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेचे शस्त्र म्हणून वापर करून त्यांच्याकडील अतिरिक्त सीईओंचा पदभार डॉ. भोकरे यांना देण्याचा ठराव मंजूर केला. वास्तविक ही प्रशासकीय बाब आहे, असा ठराव सभेला घेता येत नाही.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद