शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार हर्षवर्धन जाधव यांचा परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:26 IST

परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलेला फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी मंजूर केला.

औरंगाबाद : परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलेला फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी मंजूर केला.पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता.महाराष्टÑाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ५ जानेवारी २०११ रोजी वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आणि वेरूळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्याच्या आग्रहावरून पोलीस व आ. जाधव यांच्यात झटापट झाली होती. जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास पूर्ण करून १० मार्च २०११ रोजी न्यायालात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीअंती न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरले. सरकारी कामात अडथळा आणणे व शासकीय कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या कलमांतर्गत सत्र न्यायालयाने त्यांना वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला होता. औरंगाबाद खंडपीठाने आ. जाधव यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.दरम्यान विदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आ. जाधव यांनी अ‍ॅड. अभयसिंह भोसले यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. सुनावणीअंती न्यायालयाने सदर विनंती मंजूर केली. सरकारतर्फे अ‍ॅड. कार्तिक मुंडे व केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. डी.जी. नागोडे यांनी काम पाहिले

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय